निलेश घायवळच्या आणखी एका पंटरचा भयानक कारनामा समोर, पोलिसांनी केला गुन्हा दाखल
- Published by:Sachin S
Last Updated:
फिर्यादी सुरेश ढेंगळे याची ओळख अमोल लाखेशी धाराशिव जिल्ह्यात झाली होती. तेव्हा फिर्यादीने शेती कामासाठी लोन लागत असल्याचं सांगितलं होतं.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे: पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ कोथरूड प्रकरणानंतर देश सोडून पळून गेलाय. पोलीस त्याचा शोध घेत आहे. पण, या प्रकरणी पुणे पोलिसांनी घायवळ गँगची चांगलीच नाकाबंदी केली आहे. एका एका पंटर आणि गुन्हेगाराला पकडलं जात आहे. अशातच निलेश घायवळ याच्या साथीदारावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल लाखे नावाच्या साथीदाराने कर्ज घेण्यासाठी एका जणाची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.
advertisement
पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात अमोल लाखे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश घायवळचा “मित्र” अमोल लाखे याच्याविरोधात दुसऱ्याच्या नावाने सिम कार्ड घेऊन वापरल्याने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फिर्यादी सुरेश ढेंगळे यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश ढेंगळे याची ओळख अमोल लाखेशी धाराशिव जिल्ह्यात झाली होती. तेव्हा फिर्यादीने शेती कामासाठी लोन लागत असल्याचं सांगितलं होतं. त्याचा वापर करून आरोपी अमोल लाखे याने त्याचे सर्व कागदपत्र मागवून घेतले आणि मला पुण्याला भेटायला ये, असं सांगितलं.
advertisement
त्यानंतर ठरल्यानंतर फिर्यादी ढेंगळे जेव्हा आरोपीला भेटण्यासाठी आला तेव्हा पुण्यातील वारजे पुलाखाली सर्व लोनसाठी लागणारे कागदपत्र सोपवली होती. आरोपी अमोल लाखेनं, 'तुला लोन मिळवून देतो आणि माझा मित्र निलेश घायवाळशी बोलून करून तुला नोकरी पण लाऊन देतो' असं आमिष दाखवत सगळे कागदपत्र घेतले होते.
पण अमोल लाखेनं ढेंगळे यांच्या कागदपत्राचा गैरवापर केला. अमोलने जिओ कंपनीचं सिम कार्ड घेतलं आणि तो मोबाईल क्रमांक HDFC बँकच्या खात्याशी लिंक केला ज्यामधून अनेक गैरव्यवहार केले. याच प्रकरणी अमोल लाखेच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 29, 2025 11:28 PM IST


