एका घरात एक दोन नव्हे तर तब्बल 200 मतदार कसे राहू शकतात? असा प्रश्न कुणालाही पडल्या शिवाय राहणार नाही. कारण घराचा आकार पाहता दोनशे लोक इथं राहणं अशक्य आहे. मात्र निवडणूक आयोगाला त्याचं काही देणं घेणं नाही आणि त्यामुळे एका घरात दोनशे लोक राहात असल्याची मतदार यादीत नोंद झाली. नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी नगर परिषदेत हा प्रकार घडला आहे.
advertisement
घरमालकाला कल्पानच नाही
संपत बावनथळेंचं हे घराचे मालक आहे. एकीकडं मतदार यादीत 200 मतदार या घरात राहात असल्याची नोंद आढळून आलीय तर दुसरीकडं घर मालक बावनथळेंनाच याची साधी कल्पनाही नव्हती. परस्पर त्यांच्या घराचा पत्ता देवून मतदार नोंदणी करण्यात आली होती. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधींनी चौकशी केल्यानंतर बावनथळेंना त्याची खबर लागली.आमच्या घरच्या नावांबाबतची माहिती आहे, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही असे ते म्हणाले.
मतदार यादीतील पत्त्यांचा घोळ समोर
संपत बावनथळे यांच्या कुटुंबात पती- पत्नी, दोन मुले आणि सुना असे सहा मतदार आहेत. मात्र नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत संपत बावथळे यांच्या घरात अशाच पद्धतीने जवळपास 200 लोकांच्या नावापुढे क्रमांक 1 लिहिले आहे. मतदार यादीतील पत्त्यांचा घोळ समोर आल्यानंतर वादाला तोंड फुटलंय. वॉर्डातील रहिवासी नसलेल्यांची नावं मतदार यादीत टाकण्यात असल्याचा आरोप केला जात आहे.तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या या आरोपांचं खंडन केलंय. दरम्यान वानाडोंगरीचे मुख्याधिकारी राहुल परिहार यांनी मतदार यादीतल घोळाविषयी हे स्पष्टीकरण दिलंय.
राजकारण रंगण्याची शक्यता
काँग्रेसकडून मतचोरीचा आरोप केल्यामुळे आता विरोध पक्षाकडून मतदार याद्यांची पडताळणी केली जात आहे. त्या दरम्यान एकाच घरात दोनशे मतदारांच्या नोंदणीचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.