लातूर-हडपसर विशेष ट्रेन: 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार लातूर-हडपसर विशेष गाडी धावणार आहे. ही गाडी लातूरहून सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी हडपसरला पोहोचेल. हडपसरवरून दुपारी 4 वाजून 5 मिनिटांनी ही गाडी पुन्हा लातूरच्या दिशेने निघेल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी लातूरला पोहोचेल. सणाच्या काळात या विशेष गाडीच्या एकूण 74 फेऱ्या होणार आहे. ही गाडी हरंगुल, मुरुड, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, जेऊर आणि दौंड या स्टेशन्सवर थांबणार आहे.
advertisement
गाडी क्रमांक 01007 एलटीटी मुंबई-लातूर साप्ताहिक विशेष ट्रेन: 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनिस (एलटीटी) येथून ही गाडी रात्री 12 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी लातूरला पोहोचेल. लातूरहून हीच गाडी रविवारी दुपारी 4 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजून 50 मिनिटाला एलटीटी पोहोचेल. तर या गाडीच्या एकूण 20 फेऱ्या होणार आहे. ही गाडी ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी आणि धाराशिव स्टेशन्सवर थांबेल.
गाडी क्रमांक 01421 दौंड-कलबुर्गी अनारक्षित: 26 सप्टेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत ही गाडी आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे. दर सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी दौंड येथून सकाळी 5 वाजता ही गाडी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी कलबुर्गी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01422 कलबुर्गी-दौंड: दर सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी ही सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी दौंड येथे पोहोचेल. या अनारक्षित गाडीच्या आठवड्यातून एकूण 96 फेऱ्या होणार आहे. या गाडीला भिगवन, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणगापूर रोड येथे थांबा मिळणार आहे.
दौंड-कलबुर्गी द्वि-साप्ताहिक अनारक्षित: 25 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर याकालावधीत दर गुरुवारी आणि रविवारी दौंडवरून ही गाडी सकाळी 5 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी कलबुर्गीला पोहोचेल. तर कलबुर्गी येथून गुरुवारी आणि रविवारी रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी ही गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 2 वाजून 30 मिनिटांनी दौंडला पोहोचेल. या गाडीच्या एकूण 40 फेऱ्या होणार आहेत. या गाडीला भिगवन, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणगापूर रोड येथे थांबा मिळणार आहे.