सांगलीत शरद पवारांना मोठा धक्का, माजी महापौरांसह 16 माजी नगरसेवकांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
- Reported by:ASIF MURSAL
- Published by:Prachi Amale
Last Updated:
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मिरजेत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
सांगली : सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इन्कमिंग झाले आहे.सांगली महापालिकेच्या दोन माजी महापौरांसह 16 आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मिरजेत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या पक्ष प्रवेशांमध्ये काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा देखील प्रवेश झाला आहे.
काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गट,भाजपा आणि जनसुराज्य शक्ती पक्षातल्या आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाची ताकद वाढली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. तर पक्षप्रवेशा मध्ये मिरज दंगलीचे मुख्य सूत्रधार म्हणून ज्यांच्याकडे बोट झाले होता, त्यांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभाग झाल्याने तुम्हाला पश्चाताप होणार नाही. एवढा विश्वास देतो. पूर्वीच्या कार्यकर्त्यांच्या वर अन्याय होणार नाही असा विश्वास देतो. अनेक निवडणूक झाल्या आम्ही पण खासदार आमदार झालो. आता स्थानिक निवडणूक आहेत. याच्यातूनच उद्याचा खासदार आमदार मंत्री होतो.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, राजकीय जीवनामध्ये मी गेले 35 वर्षे काम करणारा कार्यकर्ता आहे. सांगली, सातारा या दोन जिल्ह्यांना वेगळी परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने महाराष्ट्राला महाराष्ट्राला आणि देशाला मोठे नेते दिले. मान्यवरांचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. मात्र काळा बदलतो त्यामुळे नवीन नेतृत्वाला ताकद देण्याचे काम सरकारमध्ये मान्यवरांनी घ्यायचा असतो. मी काँग्रेसच्या पंजावर निवडून आलो होतो. मात्र 99 ला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. अनेकजण त्या पक्षात गेलो. मागे न पाहता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही गेलो.
advertisement
सांगलीला विमानतळाची गरज : अजित पवार
मेट्रो सिटीची संकल्पना करणे सांगली शहराला आवश्यक आहे. जवळपास आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता विमानतळ करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सांगलीला जर मोठ्या प्रमाणात उद्योग यावे असे वाटत असतील तर विमानतळ असणे गरजेचे आहे. डेव्हलपमेंट गरजेचे आहे. शक्तीपीठ साठी सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणार. जनता आणि शेतकरी हा सर्वस्व असते. त्यांना चार पट किंमत देऊन शक्तिपीठ करू, कारण मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून तिथे काम करत आहे, असेही अजित पवार म्हणाले.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 8:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सांगलीत शरद पवारांना मोठा धक्का, माजी महापौरांसह 16 माजी नगरसेवकांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश











