मृतांमध्ये वासंती सरोदे आणि पंकज मेश्राम (दोघेही राहणार अमरावती) यांचा समावेश आहे. दोघेही आर्वी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. ते दररोज आर्वी येथून अमरावतीला ये-जा करीत असत. गुरुवारी शाळा आटोपल्यावर ते कारने अमरावतीकडे परतत असताना मार्डी रोडवर समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोराची धडक दिली.
Amravati News : लग्नाचा आनंद क्षणभरही टिकला नाही! विधी पार पडले अन् नवरदेवाचा अर्ध्या तासात मृत्यू
advertisement
वाहनांचेही मोठे नुकसान
अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. पुढील भाग पूर्णपणे खिळखिळा झाला होता. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व बचाव पथकांना मोठ्या प्रमाणात मदत घ्यावी लागली. घटनास्थळीच सरोदे व मेश्राम यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
चार गंभीर जखमींवर उपचार
या अपघातात वासंती सरोदे यांचे पती तसेच इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने अमरावतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मार्डी रोडवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहने बाजूला करून रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली. धडक नेमकी कशी झाली यासंदर्भात पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींची माहिती घेतली जात आहे.
एकाच गावातील दोन शिक्षकांचा अकस्मात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळेतील सहकारी, विद्यार्थी व पालक सुद्धा या घटनेसाठी दुःख व्यक्त करत आहेत.






