तपोवनमध्ये चालणारे व्यवसाय
विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्याशी लोकल18 ने चर्चा केली. तेव्हा ते म्हणाले, "दाजीसाहेब पटवर्धन, बाबा आमटे, महात्मा गांधी आणि इतरही अनेकांनी कुष्ठरोग असलेल्या बांधवांसाठी मोलाचं कार्य केलं. या महापुरुषांनी कुष्ठरुग्णांची सेवा केली, पण समाजाने नाकारलेल्या या घटकाला मानसन्मान मिळवून देण्यासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने दाजीसाहेबांनी तपोवनमध्ये हातमाग व्यवसाय सुरू केला होता. ते आजही तपोवनात सुरू आहेत."
advertisement
डॉ. गवई यांनी असंही सांगितलं की, तपोवनमध्ये सुतारकाम विभाग, लोहारकाम विभाग, सतरंजी विभाग, चर्मालय विभाग आणि मुद्रणालय विभाग आहेत. कुष्ठरुग्ण आपल्या हातांनी दिवाण, सोफा, कपाट, मंदिर आणि इतर लाकडी वस्तू बनवतात. तसेच चप्पल सुद्धा हे कुष्ठ बांधव आपल्या हाताने तयार करतात. याठिकाणी लोखंडी वस्तू देखील बनवल्या जातात. उत्पादनांच्या दर्जा चांगला असल्याने अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडून ऑर्डर मिळतात.
Rakshabandhan 2025:अंधारातून शोधला आयुष्याचा प्रकाश, मुलांच्या इच्छाशक्तीला सलाम
400 पेक्षा जास्त रुग्णांना रोजगार
समाजात कुष्ठरोगाबाबत अनेक गैरसमज आहेत. कुष्ठरोग असणाऱ्या व्यक्तीला समाजातून बाहेर काढलं जातं. त्यामुळे त्यांच्या जीवनात नैराश्य निर्माण होतं. तेच नैराश्य दूर करण्यासाठी दाजीसाहेबांनी प्रयत्न केले. सध्या तपोवनमध्ये 400 पेक्षा जास्त रुग्ण काम करतात. हाताला बोट नसताना सुद्धा त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळते. दाजीसाहेबांनी या रुग्णांना त्यांना आवडेल तेच काम शिकवून रोजगार मिळवून दिला. त्यांना कुष्ठरोग मुक्त करून सन्मानाने जगण्याची ऊर्जा दिली.
रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा
कुष्ठ रुग्णांसोबत इतर घटकांचाही विचार करून दाजीसाहेबांनी तपोवनमध्ये 'महामना मालवीय विद्यालय' नावाची मोफत शाळा सुरू केलेली आहे. तपोवनमध्ये एक भव्य दवाखाना देखील आहे. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस, वाचनालय, जेवण आणि राहण्याची सर्वच सुविधा तपोवनमध्ये आहे.





