छत्रपती संभाजीनगर : कोणतंही स्वप्न साकार करायचा असेल तर त्याला कष्ट, मेहनत आणि जिद्दीची जोड असेल तर ते स्वप्न साकार होतं. असंच एक स्वप्न छत्रपती संभाजी नगर शहरातील पल्लवी दलाल यांनी पाहिलं होतं आणि त्यांनी ते स्वप्न पूर्णदेखील करुन दाखवलं आहे. त्यांना व्यवसाय करायचा होता आणि त्यासाठी एकेकाळी त्यांनी घरातून व्यवसाय सुरू केला आणि आज त्या व्यवसायाचे मोठे रूपांतर केले.
advertisement
पल्लवी दलाल या छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी आहेत. त्यांना सुरुवातीपासूनच नवनवीन पदार्थ तयार करायला आवडते आणि ते पदार्थ करून खाऊ घालायलाही आवडते. त्यातच त्यांना नोकरी न करता किंवा घर सांभाळत काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणून त्यांनी मसाल्यांचा व्यवसाय करायचं ठरवलं आणि त्यांनी 'स्वादम मसाले' म्हणून मसाल्यांची कंपनी सुरू केली.
पल्लवी सांगतात की, मला काहीतरी स्वतःसाठी करायचं होतं आणि स्वयंपाकाची आवड तर होतीच म्हणून मी ठरवलं की, आपण मसाल्यांचा व्यवसाय करूयात. पण व्यवसाय सुरू करायचं म्हटलं की त्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती असायला हवी. माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यवसाय करत नव्हतं. त्यामुळे व्यवसाय सुरू करताना मला अनेक अडचणी आल्या. पण त्यावर मी मात करत आणि जिद्दीनं माझा व्यवसाय सुरू केला.
मी सुरुवातीला घरातूनच मसाले तयार करू लागली आणि शहरातील दुकानदारांना ते मसाले देऊ लागले. जशी जशी मागणी वाढत गेली तशी तशी मी मसाल्यांची उत्पादनही वाढवत गेले. जशी जशी उत्पादनाला मागणी होऊ लागली त्यानंतर मी घरातीलच एका खोलीमध्ये सर्व मसाले तयार करायला लागले. आधी मी एकटीच मसाले बनवून विकत होते. मग नंतर मी 2 महिलांना कामाला ठेवलं आणि व्यवसाय सुरू केला.
दाल-बाट पीठही प्रसिद्ध -
आता आमच्या मसाल्यांना चांगली मागणी आली आहे. सुरुवातीला मी पारंपारिक मसाले करूनच विकले पण नंतर जशी जशी ग्राहकांची मागणी आली त्यानंतर मी मसालेही वाढवत गेले. आता आम्ही 18 मसाल्यांचे प्रकार करून ग्राहकांना देतो. त्यासोबतच आपल्याकडे दाल बाटी खूप प्रसिद्ध आहे. पण या धावपळच्या जीवनामध्ये दाल बाटी करायचं म्हटलं की त्याला खूप वेळ लागतो. म्हणून मग आम्ही दालबाटी इन्स्टंट पीठ तयार केलं आणि तेदेखील ग्राहकांना दिलं. आमच्या या इन्स्टंट पिठालासुद्धा खूप मागणी आहे.
50 वर्षांपूर्वीचं तीच जुनी मापं, पण आजही सुरुये तोच व्यवसाय, पुण्यातील घोगे काकांची अनोखी गोष्ट!
सुरुवातीला मी दोन महिलांना घेऊन हा व्यवसाय सुरू केला. पण आता माझ्याकडे 15 ते 20 महिला काम करतात. तसेच 5 तरुणही माझ्याकडे कामाला आहेत. मी आधीच ठरवलं होतं की, आपण व्यवसाय करायचाय पण त्यासोबत आपण कुणालातरी रोजगार द्यायचा आणि ते माझे स्वप्नदेखील पूर्ण झालेला आहे.
स्वादम मसाले यांचे वर्षाखाली उत्पन्न हे 50 लाखांच्या वर आहे. आज मी 15 ते 20 कुटुंबांना हातभार लावू शकते, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला माझा हा व्यवसाय अजून वाढवायचा आहे आणि संपूर्ण जगामध्ये स्वादम मसाले, पोहोचवायचे आहेत, अशी माहिती पल्लवी यांनी लोकल18 शी बोलताना दिली.