भागवत अंकुश राठोड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पत्नी, सासरा आणि मामे सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरात १ ऑक्टोबर रोजी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती. ज्या नोटमध्ये त्याने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला आहे. या प्रकरणी तरुणाची आई सुनिता राठोडने पोलिस स्थानकात तक्रार दिली.
advertisement
नेमकं काय लिहिलय सुसाईड नोटमध्ये
माझी बाई, माझी परी नांदली नाही त्यामुळे मी फाशी घेतली, माझ्या सासरी पण मला शिवीगाळ केली, असे म्हटले आहे. पत्नी सासरी नांदत नसल्याने भागवत नैराश्यात होता. पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीला सासरा आणि मामेसासरा यांनी शिवीगाळ केली. त्यामुळे भागवत गेली काही दिवस नैराश्यात होता. या मानसिक तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.
सासरच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल
मुलाच्या निधनातून सावरल्यानंतर भागवतच्या आईने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पत्नी राणी राठोड, सासरा संतोष राठोड आणि मामेसासरा दत्ता राठोड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, सासरच्या त्रासाला कंटाळून जीव देण्यापर्यंत टोकाचं पाऊल भागवतने का उचललं, याचाही तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा तर दाखल झाला आहे. मात्र आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार याकडे कुटुंबीयांचं लक्ष लागलं आहे. आत्महत्येला जबाबदार धरुन कुटुंबावर कडक कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीयांची आहे.