TRENDING:

5 दिवस उशिरा होते या गणपतीची स्थापना; काय आहे परंपरा Video

Last Updated:

या गणपती बाप्पाची स्थापना 5 दिवस उशिरा होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड, 25 सप्टेंबर : गणपतीचा उत्साह महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरात दिसून येतोय. प्रत्येक शहर गाव ठिकाणी गणपतीचे मंदिरे गजबजलेले दिसून येत आहेत तर अनेक सार्वजनिक मंडळांनी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात गणपतीची स्थापना करू जवळपास 5 दिवस उलटली आहेत. असं जरी असलं तरी जवळपास ज्या दिवशी संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाची स्थापना होते त्या दिवसापासून 5 दिवसानंतर बीड जिल्ह्यातील एका गणपतीची स्थापना होते.
advertisement

कुठे होते 5 दिवसानंतर स्थापना?

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील धोंडीराज टेंबे गणेश मंडळ यावर्षी 122 वर्ष पूर्ण होतील. या गणपतीची स्थापना निजामाच्या काळापासून चालत आलेली आहे. या गणपतीची स्थापना आपल्या गणपतीच्या स्थापनेपासून जवळपास 5 दिवसानंतर होते आणि त्यामुळेच या गणपतीचा इतिहास देखील एक रंजक इतिहास म्हणून ओळखला जातो.‌

चांद्रयान- 3 ते गगनयान पाहण्याची संधी; पाहा कुठे साकारलाय अनोखा देखावा Video

advertisement

काय आहे गणेश मंडळाचा इतिहास

निजाम कालीन राजवटीत 122 वर्षांपूर्वी स्थापना मिरवणुकीस परवानगी नसल्याने मिरवणूक आढविण्यात आली होती. त्यामुळे सदस्यांनी मिरवणूक आडविल्याने त्या ठिकाणाहून घोड्यावर हैदराबादला जात ताम्रपटावर स्थापना परवानगी आणली होती. यामुळे 5 दिवस गणपती त्याच ठिकाणी थांबविण्यात आला होता. त्यामुळेच मागील 122 वर्षांपासून या गणपतीची स्थापना 5 दिवस उशिराने होते.

advertisement

धोंडीराज टेंबे गणेश मंडळ नाव कसे पडले

1901 निजाम काळात या गणपतीची स्थापना करण्यात आली. विजेची सोय नसल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रकाश असावा म्हणून भावी आगीचे टेंभे धरत असत ही परंपरा आजही कायम असून यामुळेच या गणपतीला टेंबे गणेश मंडळ नाव पडले असावे, असं या मंडळाचे अध्यक्ष अनंद जोशी यांनी सांगितले.

advertisement

विसर्जनानंतर माती द्या आणि पुढच्या वर्षी बाप्पा घ्या! पुणेकरांची भन्नाट संकल्पना

पर्यावरण पूरक मूर्तीची निर्मिती

या गणपतीची मूर्ती माती, शेण चिखल, साळवणाच्या मिश्रणातून साकारली जाते. एवढे वर्ष लोटली काळ बदलला तरी देखील इको फ्रेंडली मूर्तीची परंपरा या मंडळांनी आजही टिकवून ठेवली आहे .पीओपीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होते याचीच जाणीव ठेवत चिखल मातीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
5 दिवस उशिरा होते या गणपतीची स्थापना; काय आहे परंपरा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल