चांद्रयान- 3 ते गगनयान पाहण्याची संधी; पाहा कुठे साकारलाय अनोखा देखावा Video

Last Updated:

या कुटुंबीयांनी चांद्रयान - 3 ते गगनयान असा अनोखा देखावा सादर केला आहे. 

+
News18

News18

पुणे, 25 सप्टेंबर : सध्या सुरू असलेल्या गणेश उत्सव काळात भारताने यशस्वी रित्या फत्ते केलेल्या चांद्रयान- 3 चा बोलबाला असल्याचं दिसून येतंय. यंदा गणेशोत्सवावर चांद्रयान- 3 चा प्रभाव आहे. पुणे येथे अनेक कुटुंबांनी चांद्रयान- 3 ची आरास तयार केली आहे. यामुळे यंदा गणेशभक्तांना अध्यात्मासोबत विज्ञान अनोखा संगम पाहण्यास मिळत आहे. त्यातचं पिंपरी-चिंचवड शहरातील शहरात कापसे कुटुंबीयांनी चांद्रयान- 3 ते गगनयान असा अनोखा देखावा सादर केला आहे.
चांद्रयान- 3 तीन मोहीम इस्रोने यशस्वीरित्या पार पाडली आणि अवघ्या जगभरात भारताचं कौतुक झालं. आता हेच चांद्रयान- 3 गणेशोत्सवात देखावा म्हणून घराघरात बघायला मिळत आहे. घरगुती गणपतीपासून ते मंडळाचे गणपती चांद्रयान- 3 चा देखावा सादर करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी गावात राहणाऱ्या कापसे कुटुंबीयांनी आपल्या भारतीय शास्त्रज्ञानप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चांद्रयान- 3 ते भारताची पुढील मोहीम गगनयान असा हलता देखावा सादर केलाय.
advertisement
विसर्जनानंतर माती द्या आणि पुढच्या वर्षी बाप्पा घ्या! पुणेकरांची भन्नाट संकल्पना
भारताने यशस्वी रित्या चांद्रयान- 3  हे अवकाश्यात सोडले. आता भारत पुढील गगनयान या मोहिमेत यानाव्दारे मानव अवकाशात अभ्यासासाठी पाठवणार आहे. यंदा कापसे कुटुंबीयांनी देखाव्यासाठी सर्व रिसायकल मटेरियल वापरले आहे. देखाव्यात त्यांनी चांद्रयान, रोव्हर, अंतरिक्ष मानव आदी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हा देखावा पाहण्यासाठी त्यांच्या घरी नागरीक देखील गर्दी करू लागलेत. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत घरातील प्रत्येकाने या देखाव्यासाठी मेहनत केली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
चांद्रयान- 3 ते गगनयान पाहण्याची संधी; पाहा कुठे साकारलाय अनोखा देखावा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement