बीड शहरातील नगर रोडवरील शासकीय विश्रामगृहाजवळ असलेल्या श्री सिद्धिविनायक सुपरस्पेशियालिटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध बालशल्यचिकित्सक एम.सी.एच. सर्जन डॉ. नागेश उंदरे यांनी ही अत्यंत नाजूक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. भूलतज्ज्ञ डॉ. तुकाराम बडे यांनी संपूर्ण प्रक्रियेत सुरक्षित भूल व्यवस्थापन केले.
Pune News: सावधान! स्कूल व्हॅनमध्ये तुमची मुलं सुरक्षित आहेत का? व्हॅनचालकाच्या कृत्यानं पुणे हादरलं
advertisement
या अवघड शस्त्रक्रियेत रुग्णालयातील आरएमओ डॉ. झिशान मोमीन, ओटी तंत्रज्ञ दयानंद राठोड, शिवाजी वांडरे व राम मंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच रुग्णालयाच्या सुसज्ज नवजात अतिदक्षता विभागात (NICU) पुढील उपचार सुरू आहेत.
विशेष बाब म्हणजे, ही संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आली. खासगी रुग्णालयात यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ रुग्णांनाही उच्च दर्जाची उपचारसेवा आता बीडमध्येच मोफत मिळणार असून, मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज उरलेली नाही.






