जरांगेंच्या नौटंकीला मराठा आता भुलणार नाही, त्यांनी मराठा समाजाचा विश्वास गमावलाय. जरांगेंनी मविआची सुपारी घेतलीय हे स्पष्ट झालंय. जरांगेना सत्तेची आस लागलीय. आता पटोले आणि पवारांनीन आरक्षणावर भूमिका सांगावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. जरांगेंच्या पोटात जे होते ते ओठात आले. जरांगेंननी मविआकडून सुपारी घेतलीय, लोक जरांगेंना प्रश्न विचारू लागले आहेत असंही दरेकर यांनी म्हटलं.
advertisement
Manoj Jarange: अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, या कारणामुळे घेतली माघार
जरांगे राजकारण करतात का या मुद्द्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, जरांगे एकीकडे म्हणतात राजकारणात रस नाही, दुसरीकडे म्हणतात याला पाडू, त्याला पाडू अशी भाषा करतात. जरांगेंनी निवडणुका लढवाव्यात, राजकारणात यावं. कुणाला निवडून आणणार, कुणाला पाडणार यातून सर्व दिसून आलेले आहे. मला राजकरणात रस नाही असे जरांगे म्हणतात मग राजकीय का बोलतात? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.
जरांगेंच्या आोदलनाला कुणाची फूस हे स्पष्ट आहे. फडणवीसांवर पातळी सोडून टीका, जरांगे फक्त भाजप आणि फडणवीसांना टार्गेट करतात. जरांगे यांच्या मागे कोण आहे हे वेगळ सांगायची गरज नाही. जरांगेने मराठ्यांचे प्रश्न सोडले ते राजकीय ओरिएंटल झाले. त्यांची अपेक्षा आहे मला आता जेल मध्ये टाकावे. त्यांची प्रसिध्दी कमी झाली म्हणून त्यांचा अट्टाहास आहे असं दरेकर म्हणाले.