तुळजापुरमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याचं पाहायला मिळालं. किरकोळ कारणांवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. कुलदीप मगरवर पिटू गंगेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. कुलदीप मगर कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सुरज साठे, चेतन शिंदे याने गोळीबार केला सागर गंगणे, शुभम साठे, शेखर गंगणे ,नंदू गंगणे, बालाजी गंगणे, अतुल दळवी या आरोपीने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
विरोधात प्रचार का केला?
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिंटू गंगणे यांच्या विरोधात प्रचार का केला? तुला उचलून त्यांच्या हवाली करत त्यांच्यासमोर संपवायचे आहे म्हणून मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. कुलदीप मगरच्या फिर्यादीत ड्रगजमापिया विनोद पिंटू गंगणे याचाही उल्लेख आहे. तर आठ आरोपीवर पोलिसांनी दहशत माजवणे फायरिंग करणे यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
वादाचे रूपांतर फायरिंग आणि मारहाणीत
मंगळवारी रस्त्याच्या कामावरून विनोद पिंटू गंगणे व ऋषी मगर यांच्या झाला होता. त्यानंतर वादाचे रूपांतर फायरिंग आणि मारहाणीत झाले. दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर इतर आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. तुळजापूर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची न्यूज 18 लोकमतला माहिती आहे.
अनुचित प्रकार घडू नये यासाठी कठोर कारवाई
21 डिसेंबर 2025 रोजी सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी होणार आहे. त्याचे निकाल आणि त्यानंतरची परिस्थिती हाताळण्याच्यादृष्टीने लीस अधिकाऱ्यांनी आवश्यक बंदोबस्ताच्यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेळीच उपाययोजना करावी आणि अशा काही घटना घडल्यास त्वरित कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.
हे ही वाचा :
