TRENDING:

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, 'ही' गाडी आता वेगळ्या स्थानकातून सुटेल!

Last Updated:

लोहमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी रोलिंग कॉरिडॉर ब्लॉक घेण्यात आला आहे. प्रवाशांची ब्लॉककाळात काहीशी अडचण होईल. परंतु पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर
ब्लॉकमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्लॉकमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement

परभणी : मराठवाड्यात अनेक प्रवासी दररोज रेल्वेनं प्रवास करतात. इथून महाराष्ट्रासह देशभरात रेल्वेगाड्या जातात. त्यामुळे इथल्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नांदेड-मनमाड रेल्वे आता नांदेडहून नाही, तर परभणीतून धावेल. ब्लॉकमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोहमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी रोलिंग कॉरिडॉर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळेच 07777 नांदेड-मनमाड एक्स्प्रेस डेमू 17 जुलै ते 31 जुलै या कालावधीत नांदेड ते पूर्णादरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत ही गाडी पूर्णाहून सुटेल आणि मनमाडपर्यंत धावेल. तर, 07778 मनमाड-नांदेड डेमूसुद्धा 31 जुलैपर्यंत मनमाड ते पूर्णादरम्यान धावेल. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली आहे.

advertisement

हेही वाचा : प्रवाशांनो लक्ष असू द्या, ट्रॅक दुरुस्तीसाठी 'ही' गाडी महिनाभर रद्द!

दरम्यान, दररोज नांदेड ते मनमाड असा प्रवास अनेकजण करतात. तसंच छत्रपती संभाजीनगर इथूनसुद्धा अनेक प्रवासी दररोज रेल्वे प्रवास करतात, त्याचबरोबर मनमाडहूनसुद्धा अनेक प्रवासी नांदेडला जातात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

या सर्व प्रवाशांची ब्लॉककाळात काहीशी अडचण होईल. परंतु पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांनी हे मार्ग लक्षात घेऊनच आपला प्रवास निश्चित करावा, जेणेकरून अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, 'ही' गाडी आता वेगळ्या स्थानकातून सुटेल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल