छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी परीसरात दरवर्षी जगभरातून प्रवासी पक्षी दाखल होत असतात. या पक्ष्यांची गणना प्रत्येक वर्षी केली जाते. यंदा देखील अशी गणना करण्यात आली. पैठण येथील नाथसागरला लागून असलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात 27 ठिकाणी 10 पथकांनी आशियाई पाणपक्षी गणना केली. यात पक्षांच्या 250 पेक्षा अधिक प्रजाती आढळल्या असून मागील वर्षी गायब असलेले मंगोलिया, रशिया, रफ हे पक्षी यावर्षी आढळल्या आहेत. याबाबत लोकल18 सोबत बोलताना मानद वन्यजीव संरक्षक डॉ. किशोर पाठक यांनी माहिती दिलीये.
advertisement
जायकवाडी पक्षी अभयारण्यात दरवर्षी पक्षी गणना केली जाते. यावर्षी देखील अशीच गणना करण्यात आली आहे. सोनेवाडी, जायकवाडी अभयारण्य, पन्नालालनगर, टाकळी, लांबगव्हाण, दहेगाव, विजापूर, वरखेड, कायगाव टोका, मावसगव्हण, रामडोव्ह, बोट हाऊस येथे पक्षी गणना केली. यात प्रामुख्याने फ्लेमिंगो, कॉमनकूट (वारकरी), स्पॉटबिल (हळदी-कुंकू), पोचार्ड, कार्पोरंट, सिगल, व्हिस्पर टर्न, रिव्हर टर्न, रेड कॅपेड आयबीस, ग्लॉसी आयबीस, ब्लॅक हेडेड आयबीस, ब्राम्ही डक, किंग फिशर, रॉबिन, ब्लॅक विंग स्टील्ट, येलो वेगटेल आदी पक्षी आढळले, असे पक्षीमित्र प्रा. संतोष गव्हाणे म्हणाले.
दुधापेक्षा पाणी महाग! सांगा कसं परवडणार? शेतकऱ्यानं हिशोबच मांडला..
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पक्षांची संख्या काही प्रमाणात घटली असून मागील वर्षी गायब असलेले मंगोलिया, रशिया, रफ हे पक्षी देखील आढळले आहेत. यावर्षी अनेक पक्षीही कमी झालेले आहेत याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी मासेमारी केली जाते त्यासोबत मानवाचा हस्तक्षेप देखील वाढला आहे. त्यामुळे देखील या पक्षांची संख्या कमी झालेली आहे. आपण सर्वांनी मिळून जास्तीत जास्त पक्ष्यांची संख्या वाढेल याकडे लक्ष दिल पाहिजे असं डॉक्टर पाठक म्हणाले.





