TRENDING:

कडाक्याच्या थंडी नंतर राज्यात पुन्हा नवसंकट, या शहरांमध्ये 2 दिवस पावसाची शक्यता

Last Updated:

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळणार असून किमान आणि कमाल तापमानात देखील वाढ होणार आहे. तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी 
advertisement

मुंबई : राज्यातील तापमानात होत असलेल्या चढ उतारांबरोबरच हवामानातही बदल होत आहेत. मागील दोन दिवसांपासून राज्यभरात कडाक्याची थंडी असल्याचं जाणवत आहे. परंतु 9, 10 आणि 11 जानेवारी रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळणार असून किमान आणि कमाल तापमानात देखील वाढ होणार आहे. तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यात हवामान कसं असेल.

advertisement

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी धुके असणार आहे तर त्यानंतर आकाश ढगाळ राहणार आहे तर मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे राहील. मुंबईतील किमान तापमानामध्ये लक्षणीय वाढ होणार असून थंडी कमी होणार आहे. तर पुणे शहरामध्ये मुंबई प्रमाणेच सकाळच्या वेळी धुके तसेच त्यानंतर ढगाळ आकाश राहील तर पुण्यातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढे राहील पुण्यामध्ये ढगाळ आकाशाबरोबर थंडी देखील कायम असणार आहे.

advertisement

मकर संक्रांतीची करा शॉपिंग, 60 रुपयांपासून मिळतील वस्तू, अमरावतीमध्ये खरेदीसाठी हे बेस्ट ऑप्शन!

तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश 9 जानेवारी रोजी राहणार आहे तर संभाजीनगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढे राहील. तर संभाजीनगरमध्ये 11 आणि 12 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची देखील शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर बरोबरच नाशिकमध्ये ही 10 जानेवारी रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. 9 जानेवारी रोजी नाशिकमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे राहील तर सकाळच्या वेळी धुके तर त्यानंतर ढगाळ आकाश राहील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मात्र निरभ्र आकाश राहणार आहे तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस एवढे राहील. नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत पुढील दोन-तीन दिवस राज्यामध्ये ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर विदर्भामध्ये मात्र थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
कडाक्याच्या थंडी नंतर राज्यात पुन्हा नवसंकट, या शहरांमध्ये 2 दिवस पावसाची शक्यता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल