आजारी सासऱ्याला पाहायला जाताना काळाचा घाला, मुलाच्या डोळ्यादेखत आई-वडिलांचा मृत्यू, छ.संभाजीगनरमधील ह्रदयद्रावक घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरातील नक्षत्रवाडीजवळ हा अपघात घडला. धुळे-सोलापूर महामार्गावर यू-टर्न घेत असलेल्या आयशर ट्रकखाली
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातून भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर यू-टर्न घेत असलेल्या आयशर ट्रकखाली दुचाकी सापडल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर असलेले पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील नक्षत्रवाडीजवळ हा अपघात घडला. धुळे-सोलापूर महामार्गावर यू-टर्न घेत असलेल्या आयशर ट्रकखाली दुचाकी आल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे. राधा गोमलाडू आणि गजानन गोमलाडू असं मृत दाम्पत्याचं नाव असून त्यांचा मुलगा विशाल गोमलाडू हा गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
गोमलाडू कुटुंब दुचाकीवरून जालन्याकडे जात होतं. आजारी सासऱ्यांना भेटण्यासाठी गोमलाडू कुटुंब आपल्या दुचाकीवरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. नक्षत्रवाडी परिसरात पोहोचले असता अचानक एक आयशर ट्रॅक यू-टर्न घेत होता, त्यावेळी दुचाकीवर नियंत्रण मिळवता आलं नाही, दुचाकी थेट आयशर ट्रकला धडकली.
हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालवणारे गजानन गोमलाडू यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर राधा गोमलाडू यांनीही घटनास्थळावर प्राण सोडले. या अपघातात दुचाकी चक्काचूर झाली आहे. तर त्यांचा मुलगा विशाल हा दोघांच्या मधे बसलेला होता, त्यामुळे तो बचावला. पण, गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गजानन गोमलाडू आणि राधा गोलमाडू यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी ट्रकचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सातारा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 5:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजारी सासऱ्याला पाहायला जाताना काळाचा घाला, मुलाच्या डोळ्यादेखत आई-वडिलांचा मृत्यू, छ.संभाजीगनरमधील ह्रदयद्रावक घटना


