धर्मेंद्र यांच्या सूना काय करतात? मुलींपेक्षाही श्रीमंत, एकीचं 300 कोटींचे साम्राज्य, दुसरीचे थेट ब्रिटिश राजघराण्याशी कनेक्शन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dharmendra Daughter in Law : धर्मेंद्र यांच्या सहाही मुलांबद्दल आता सर्वच जाणतात, पण त्यांच्या सुनाही काही कमी नाहीत. पाहा, धर्मेंद्र यांच्या सूना काय करतात?
मुंबई: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव चर्चेत आहेत. मात्र, इतर अनेक कारणांमुळे त्यांचा परिवार नेहमीच चर्चेत असतो. धर्मेंद्र यांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्या मुलांनी त्यांना आधार दिला. धर्मेंद्र यांच्या सहाही मुलांबद्दल आता सर्वच जाणतात, पण त्यांच्या सुनाही काही कमी नाहीत.
advertisement
धर्मेंद्र यांच्या दोन्ही सुना, म्हणजेच सनी देओलची पत्नी पूजा देओल आणि बॉबी देओलची पत्नी तान्या देओल या अभिनयाच्या दुनियेपासून दूर असूनही, त्यांच्या साधेपणामुळे, मजबूत कौटुंबिक मूल्यांमुळे आणि त्यांच्या कामामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. देओल घराण्यात इतके स्टार्स असतानाही या दोघींनीही खासगी आणि शांत आयुष्य जगणे निवडले आहे.
advertisement
सनी देओलची पत्नी पूजा देओल (मूळ नाव लिंडा देओल) यांचा जन्म २१ सप्टेंबर १९५७ रोजी लंडनमध्ये झाला. नवभारत टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, पूजा देओलच्या कुटुंबाचे मूळ ब्रिटिश राजघराण्याशी जोडलेले आहे. त्यांची आई, जून सारा, या ब्रिटिश रॉयल फॅमिलीशी संबंधित होत्या. जून सारा यांनी 'ट्यूडर होल्डिंग्ज लिमिटेड'मध्ये सचिव म्हणूनही काम केले आहे.
advertisement
advertisement
advertisement
बॉबी देओलची पत्नी तान्या देओल यांच्याकडे ग्लॅमर नसले तरी आर्थिक आणि व्यावसायिक ताकद आहे. बॉबी आणि तान्या यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटासारखी आहे. एका मित्राच्या पार्टीत, इटालियन कॅफेमध्ये बॉबीने तान्याला पहिल्यांदा पाहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला. बॉबीने त्याच ठिकाणी तान्याला प्रपोज केले आणि १९९६ मध्ये दोघांनी लग्न केले.
advertisement
तान्या या प्रसिद्ध बँकर आणि व्यापारी दिवंगत देवेंद्र आहूजा यांच्या कन्या आहेत, जे सेंचुरियन बँकेचे प्रमोटर होते. देवेंद्र आहूजा यांच्या निधनानंतर तान्याला सुमारे ३०० कोटी रुपये किमतीची मालमत्ता आणि शेअर्स वारसा म्हणून मिळाले. एवढी मोठी संपत्ती असूनही, तान्याने इंटीरियर डिझायनर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
advertisement


