IPL 2026 : चर्चा संजू-जडेजाची, पण गेम मुंबईने फिरवला, रोहितला चॅम्पियन बनवणारा कमबॅक करणार! स्पिनरही रडारवर

Last Updated:

आयपीएल ट्रेडवरून संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजाची चर्चा सुरू असतानाच मुंबई इंडियन्सने मोठा डाव टाकला आहे. रोहितला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूच्या कमबॅकसाठी मुंबईने प्लान आखला आहे.

चर्चा संजू-जडेजाची, पण गेम मुंबईने फिरवला, रोहितला चॅम्पियन बनवणारा कमबॅक करणार! स्पिनरही रडारवर
चर्चा संजू-जडेजाची, पण गेम मुंबईने फिरवला, रोहितला चॅम्पियन बनवणारा कमबॅक करणार! स्पिनरही रडारवर
मुंबई : आयपीएल 2026 आधी सगळ्या टीम त्यांची टीम मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2026 च्या सिझनसाठीचा लिलाव डिसेंबर महिन्यात होणार आहे, त्यासाठी सर्व टीमना 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांनी रिटेन केलेल्या तसंच रिलीज केलेल्या आणि ट्रेड केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता सर्व टीमची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याआधी सीएसके आणि राजस्थान रॉयल्समध्ये सुरू असलेल्या डीलची चर्चा सुरू आहे.
राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला द्यायची ऑफर सीएसकेला दिली आहे, याबदल्यात राजस्थानने सीएसकेचे रवींद्र जडेजा आणि सॅम करन हे दोन खेळाडू मागितले आहेत. सीएसके आणि राजस्थान यांच्यात बोलणी सुरू आहेत, पण दुसरीकडे पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडून पडद्यामागे वेगवान घडामोडी सुरू आहेत. मुंबई इंडियन्सने शेवटची आयपीएल ट्रॉफी 2020 साली जिंकली, यानंतर मागच्या पाच मोसमात त्यांना यश आलेलं नाही. मुंबईला 2020 ला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूचं मुंबईच्या टीममध्ये कमबॅक होऊ शकतं.
advertisement

राहुल चहरचं कमबॅक होणार?

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्स पुढच्या मोसमासाठी त्यांची स्पिन बॉलिंग मजबूत करण्याच्या तयारीत आहे. यासाठी मुंबईची नजर त्यांच्याकडूनच खेळलेल्या दोन जुन्या लेग स्पिनरवर आहे. राहुल चहर हा मागच्या मोसमात सनरायजर्स हैदराबादचा भाग होता, पण आयपीएलच्या मागच्या मोसमात त्याला एकच मॅच खेळण्याची संधी मिळाली होती. मुंबईने अजून सनरायजर्ससोबत चर्चा सुरू केली नसली, तरी राहुल चहरला टीममध्ये घेण्यासाठी मुंबई उत्सुक आहे.
advertisement
2020 साली मुंबई इंडियन्स शेवटची आयपीएल ट्रॉफी जिंकली, तेव्हा राहुल चहर त्या टीमचा भाग होता. यानंतर तो पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादच्या टीममध्ये होता. राहुल चहरला हैदराबादने 3.2 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे, त्यामुळे त्याला टीममध्ये घ्यायचं असेल तर मुंबईला 3.2 कोटी रुपये खर्च करावे लागतील, अन्यथा सध्या टीममध्ये असलेला खेळाडू हैदराबादला द्यावा लागेल.
advertisement

मयंक मार्कंडेवरही नजर

राहुल चहरचं टीममध्ये कमबॅक होऊ शकलं नाही तर सध्या केकेआरकडे असलेला लेग स्पिनर मयंक मार्कंडे याच्यावरही मुंबईची नजर आहे. मयंक मार्कंडे देखील याआधी मुंबईकडून खेळला आहे. मयंकसाठी मुंबई कॅश डील करू इच्छिते, तसंच यासाठी ते केकेआरकडे लवकरच प्रस्तावही पाठवू शकतात. केकेआरने मयंकला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं होतं, त्यामुळे मुंबईसाठी ही डील सोपी ठरू शकते. मयंकने 2018 साली मुंबई इंडियन्सकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.
advertisement

अर्जुनच्या बदल्यात ठाकूर

दुसरीकडे क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यातही ट्रेड डीलच्या चर्चा सुरू आहेत. अर्जुन तेंडुलकरला देऊन मुंबई इंडियन्स शार्दुल ठाकूरला टीममध्ये आणण्यासाठी इच्छुक असल्याचं या वृत्तात सांगण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : चर्चा संजू-जडेजाची, पण गेम मुंबईने फिरवला, रोहितला चॅम्पियन बनवणारा कमबॅक करणार! स्पिनरही रडारवर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement