Devendra Fadnavis: पुण्यातील भाजप नेत्याची तब्येत बिघडली, देवाभाऊ देवासारखे धावले; फक्त 180 सेकंदात...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अचानक प्रकृती खालावल्याने त्यांनी मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला अन् चक्रं फिरली
पुणे : भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या हृदयावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शस्त्रक्रियेनंतर जगदीश मुळीक यांनी सोशल मीडियावरून आपला अनुभव व्यक्त केला आहे. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांनी मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. त्या वेळी फडणवीस यांनी तात्काळ आवश्यक ती मदत मिळवून दिल्याचे मुळीक यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच त्यांचे आभार देखील मानले आहे.
जगदीश मुळीक म्हणाले, कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे विसरता येत नाहीत. अलीकडे मी माझी सीटी अँजिओग्राफी करून घेतली होती. त्याचा रिपोर्ट चुकीचा आल्याने पुण्यातील डॉक्टरांनी काळजी व्यक्त केली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत मी तात्काळ आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांना फोन केला. फक्त तीन मिनिटांतच देवाभाऊंनी स्वतः डॉक्टरांशी संपर्क साधून मला परत फोन केला आणि शांतपणे सांगितले, “जगदीश, उद्या दुपारी चार वाजता डॉ. रमाकांत पांडा यांना भेट, मग पुढचं आपण ठरवू.” दुसऱ्या दिवशी मी डॉ. पांडा यांना भेटलो. त्यांनी तपासणी करून तात्काळ अँजिओग्राफी केली आणि परिस्थिती लक्षात घेऊन लगेचच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले. पुढच्या दिवशीच माझी बायपास सर्जरी करण्यात आली. हे सर्व इतकं अचानक आणि तातडीचं झालं की कोणाशी काही बोलण्यासही वेळ मिळाला नाही. त्या संपूर्ण काळात माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी माझ्यासोबत ठाम उभे राहिले.
advertisement
सुखदुःखात सहभागी होणारे संवेदनशील मुख्यमंत्री : जगदीश मुळीक
जगदीश मुळीक म्हणाले, या सर्व प्रसंगात देवाभाऊंनी ज्या प्रकारे माझी काळजी घेतली, ती खरंच लहान भावासारखी होती. मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता, आत्मीयता आणि जिव्हाळा मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी डॉक्टरांशी स्वतः संवाद साधला, उपचाराची तातडीने व्यवस्था केली आणि आज, ऑपरेशननंतर काही दिवसांनी, स्वतः भेट द्यायलाही आले. त्यांच्या या भेटीतून मिळालं ते फक्त आशीर्वाद नव्हे, तर मानसिक बळ आणि आत्मविश्वासाचा अनमोल आधार.देवेंद्र फडणवीस हे फक्त नेता नाहीत, तर कार्यकर्त्यांना भावासारखे समजणारे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत.
advertisement
लवकरच पुणेकरांच्या सेवेत : जगदीश मुळीक
महाराष्ट्राला अशाच नेतृत्वाची गरज होती आणि ते नेतृत्व आपल्याला देवभाऊंच्या रूपाने लाभले आहे.या काळात माझ्या उपचारासाठी तत्परतेने मदत केलेल्या डॉ. रमाकांत पांडा तसेच त्यांची संपूर्ण टीम, डॉ. ज्ञानेश गवारे आणि डॉ. अभिजित लोढा यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या कौशल्यपूर्ण सेवेमुळे आणि देवभाऊंच्या संवेदनशील तत्परतेमुळे आज मी पुन्हा एकदा बळकट उभा आहे. सध्या माझी तब्येत सुधारते आहे आणि काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मी लवकरच पुणेकरांच्या सेवेत पुन्हा रुजू होणार आहे, असेही जगदीश मुळीक म्हणाले
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 13, 2025 5:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Devendra Fadnavis: पुण्यातील भाजप नेत्याची तब्येत बिघडली, देवाभाऊ देवासारखे धावले; फक्त 180 सेकंदात...


