IND vs SA : लपवता लपवता कॅप्टन गिलने प्लेइंग इलेव्हनच सांगून टाकली, पहिल्या टेस्टसाठी 'अशी' असेल टीम
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
उद्या 14 नोव्हेंबर 2025 पासून भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. हा सामना कोलकत्ताच्या ईडन गार्डनर मैदानावर पार पडणार आहे.
India vs South Africa 1st Test : उद्या 14 नोव्हेंबर 2025 पासून भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. हा सामना कोलकत्ताच्या ईडन गार्डनर मैदानावर पार पडणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच कॅप्टन गिलने प्लेइंग इलेव्हनवर मोठं भाष्य केलं. हे भाष्य करताना त्याने अख्खी प्लेइंग इलेव्हनच सांगून टाकली आहे.
साऊथ आफ्रिकेविरूद्ध पहिल्या टेस्टआधी कॅप्टन शुभमन गिल न बोलता अख्खी प्लेइंग इलेव्हन सांगून मोकळा झाला आहे.खरं तर गिलला प्लेइंग इलेव्हनबाबत पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं होतं. यावर तो म्हणाला, अतिरिक्त अष्टपैलू खेळाडू किंवा अतिरिक्त फिरकी गोलंदाज निवडणे नेहमीच कठीण असते.म्हणून,अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी एकाची निवड करणे हा एक निर्णय आहे, असे म्हणत त्याने या दोन खेळाडूंपैकी एकाचीच निवड होणार असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे गिलच्या या विधानाने काही प्रमाणात प्लेईंग इलेव्हन स्पष्ट होते आहे. आता ती कशी ते जाणून घेऊयात.
advertisement
पत्रकार परिषदेत ज्याप्रमाणे शुभमन गिलने सांगितले की अक्षर पटेल किंवा कुलदीप यादवचीच निवड होणार आहे. त्याप्रमाणे पाहिले तर जर मोठी बॅटींग लाईनअप हवी असेल तर अक्षर पटेलची निवड केली जाईल. आणि जर बॅटींग लाईन खालपर्यंत ठीक असेल तर कुलदीप यादवला घेतले जाईल.तसेच स्पिनर्ससाठी जर मैदानात अनुकूल असेल तर कुलदीपचाच संघात समावेश होईल.
advertisement
त्यामुळे या दोघांमधून एक जण फिक्स आहे. आता पुढे ध्रुव जुरेल आणि रिषभ पंत हे दोन्ही खेळाडू खेळणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे हे तीन खेळाडू झालेच त्यांच्यासोबत कर्णधार शुभमन गिल चौथा खेळाडू झाला. आता टीम इंडियाच्या सलामी जोडीतही कोणताही बदल नसणार आहे.त्यामुळे यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलच ओपनिंग करतील. त्याचसोबत साई सुदर्शन जोडीला असेल, त्यामुळे असे हे सात खेळाडू होतात. त्यात रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर हे दोन ऑलराऊंडर आणि जसप्रीत बुमराह,मोहम्मद सिराज या दोन वेगवान गोलंदाजांनंतर भारताची प्लेइंग इलेव्हन रेडी होती.त्यामुळे पहिल्या टेस्टमध्ये अशी प्लेइंग इलेव्हन असण्याची शक्यता आहे.
advertisement
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :
यशस्वी जयस्वाल,केएल राहुल, ध्रुव जुरेल, शुभमन गिल (कर्णधार),रिषभ पंत (उप कर्णधार), साई सुदर्शन, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह,मोहम्मद सिराज,
साऊथ आफ्रिकेचा संघ :
view commentsट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, काइल वेरेन (विकेटकिपर), सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, कॉर्बिन बॉश, सेनुरान मुथुसामी, झुबेर हम्जा,विआन मुल्डर
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 5:19 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : लपवता लपवता कॅप्टन गिलने प्लेइंग इलेव्हनच सांगून टाकली, पहिल्या टेस्टसाठी 'अशी' असेल टीम


