राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरात आधीच अंतिम प्रभाग रचना यापूर्वी प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाली आहे. तसंच महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
advertisement
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरणे - २३ डिसेंबर
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस - ३० डिसेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी - ३१ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याचे मुदत - २ जानेवारी
चिन्ह वाटप - ३ जानेवारी 2026
मतदान - १५ जानेवारी 2026
मतमोजणी - १६ जानेवारी 2026
पक्षीय बलाबल - एकूण जागा (११३)
शिवसेना - २९
भारतीय जनता पक्ष (भाजप) - २२
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) - २५
काँग्रेस -१०
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)- ०३
बहुजन समाज पक्ष (BSP) -०५
इतर / अपक्ष- १९
विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर महापालिका मागील निवडणुकीत शिवसेना हा सगळ्या मोठा पक्ष ठरला होता. शिवसेनेनं भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली होती. तर दुसरीकडे, एमआयएमने AIMIM सुद्धा २५ जाागा जिंकून दुसरं स्थान पटकावलं होतं.
छत्रपती संभाजीनगर महापालिका
एकूण ११५ सदस्यांपैकी ५८ जागा महिलांसाठी आरक्षित
इतर मागास प्रवर्गासाठी (OBC) ३१ जागा आरक्षित
अनुसूचित जातीसाठी (SC) २२ जागा आरक्षित
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (ST) २ जागा आरक्षित
या 29 महापालिकेत होणार निवडणूक
अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भिवंडी-निजामपूर, बृहन्मुंबई, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मीरा-भाईंदर, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, नवी मुंबई, पनवेल, परभणी, पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर आणि वसई-विरार.
