धाराशिव : तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे ऑगस्ट महिन्यातील सिंहासन पूजेसाठी 21 जुलैपासून करण्यात येणार नोंदणी आहे. 21 जुलै ते 26 जुलैला सकाळी 10 वाजेपर्यंत ऑनलाइन ही नोंदणी करता येणार आहे. मंदिर संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावर ही नोंदणी केली जाते.
तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यासह इतर ठिकाणांहून भाविक कुळाचार आणि कुळधर्म करण्यासाठी येतात. त्यामध्ये देवीची सिंहासन पूजा महत्त्वाची मानली जाते. ही सिंहासन पूजा नोंदणी ऑनलाइन पद्धतीने तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या https://shrituljabhavanitempletrust.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
advertisement
जिथे तुकाराम महाराजांनी थांबा घेतला, पुण्यातील त्या मंदिरात अशी साजरी होते आषाढी, VIDEO
ऑगस्टमधील सिंहासन पूजा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. भाविकांनी सिंहासन पूजा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https:// shrituljabhavanitempletrust.org यावरून सिंहासन पूजा पास बुकिंग या मेन्युवर क्लिक केल्यानंतर https://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर प्रवेश करून नोंदणी करावी.
सिंहासन पूजा नोंदणी 21 जुलैला सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे. तर 26 जुलैला सकाळी 10 वाजेपर्यंत ही नोंदणी करता येईल. ऑनलाइन ड्रॉ पद्धतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस 27 जुलैला साडे दहा वाजता पाठविण्यात येतील. भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाइन पेमेंट 28 जुलैला सकाळी 10 वाजेपर्यंत करावे.
ऑगस्ट महिन्याची अंतिम सिंहासन पूजा बुकिंग झाल्याची यादी 30 जुलैला सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.