तुळशीच्या पानावर अन् फळ्यावर खडूच्या साहाय्याने विठ्ठलाची प्रतिमा, कोल्हापूरच्या मायक्रो आर्टिस्टची कमाल

Last Updated:

पेशाने कलाशिक्षक असले तरी आपली कला वेगवेगळ्या पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काम कोल्हापुरातील संतोष कांबळे हे करत आले आहेत.

+
कोल्हापूरच्या

कोल्हापूरच्या मायक्रो आर्टिस्टची कमाल

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : आषाढी एकादशीनिमित्त बरेच जण पंढरपूरच्या वारीसाठी जात असतात. मात्र, कित्येक जणांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. अशावेळी बरेचसे कलाकार आपल्या कलेतून विठ्ठलाप्रती असणारी आपली भक्ती व्यक्त करतात. कोल्हापुरातील एका मायक्रो आर्टिस्टनेही अशाच प्रकारे मायक्रो आर्टच्या माध्यमातून आपली विठ्ठल भक्ती व्यक्त केली आहे.
पेशाने कलाशिक्षक असले तरी आपली कला वेगवेगळ्या पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काम कोल्हापुरातील संतोष कांबळे हे करत आले आहेत. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावचे संतोष कांबळे हे पेठ वडगाव येथील बळवंतराव हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शाळेत कलाशिक्षक असल्यामुळे फळा आणि खडू यांच्याशी त्यांची रोजच भेट होते. मात्र, याच रंगीत खडू व फळा यांच्या माध्यमातून विविध चित्र कलाकृती साकारून त्यांनी एक कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे.
advertisement
त्याचबरोबर मोरपिसावर, साबणावर अशा विविध गोष्टींवरही अनेक छोट्या कलाकृती त्यांनी याआधी साकारल्या आहेत. त्यातच आता आषाढी एकादशी निमित्त बोटाच्या पेरा इतक्या आकाराच्या तुळशीच्या पानावर आणि खडू नये फळ्यावर विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. याद्वारे त्यांनी पांडुरंगाप्रती आपली भक्ती सादर केली आहे.
advertisement
कसे साकारले शिल्प?
एका छोट्याशा तुळशीच्या पानावर संतोष यांनी अत्यंत बारीक पॉईंटच्या ब्रशने रंगीत असे चित्र रेखाटले आहे. अगदी हुबेहू ही प्रतिमा दिसते. तर शाळेतील फळ्यावर एका लहान बालकाने विठ्ठलाच्या डोक्यावर छत्री धरलेले चित्र त्यांनी रेखाटले आहे. यामध्ये पावसात भिजणाऱ्या पांडुरंगाला वाचवण्यासाठी लहानग्याचे चाललेले प्रयत्न दिसून येतात.
advertisement
कोणकोणत्या साकारल्या आहेत कलाकृती?
आजपर्यंत संतोष यांनी विविध कलाकृती साकारलेल्या आहेत. यामध्ये स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, बाजीप्रभू देशपांडे, भगवान श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम विठ्ठल रुक्मिणी आदी देवदेवता, अनेक महापुरुष, नेतेमंडळी तसेच अनेक मानवाकृती हुबेहूब खडूमध्ये संतोष यांनी कोरल्या आहेत.
तर खडूबरोबरच आंघोळीच्या साबणामध्ये, मोरपिसावर, विविध झाडांच्या पानांवर त्यांनी अत्यंत विलोभनीय कलाकृती साकारलेल्या आहेत. तसेच कोणतीही जयंती किंवा पुण्यतिथी असल्यास शाळेच्या फलकावर फक्त खडूच्या साहाय्याने हुबेहूब प्रतिकृती रेखाटण्यात संतोष यांचा हातखंडा आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
तुळशीच्या पानावर अन् फळ्यावर खडूच्या साहाय्याने विठ्ठलाची प्रतिमा, कोल्हापूरच्या मायक्रो आर्टिस्टची कमाल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement