फुल विक्रेते कासिम कुंडले हे गेल्या 10 ते 15 वर्षांपासून सोलापुरातील विजापूर नाका येथे फुल विक्रीचा व्यवसाय करतात. सध्या गणेश उत्सवासाठी विविध फुलांची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे अति पावसामुळे फुलांचं उत्पादन कमी झालं आहे. सध्या सोलापूर शहरात दक्षिण सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर तालुक्यातून फुलांची आवक होत आहे.
Ganpati Visarjan: 'ये नहीं देखा तो, कुछ नहीं देखा'! ही आहेत मुंबईतील प्रसिद्ध गणेश विसर्जन स्थळं
advertisement
श्रावण महिन्यात गुलाबाचे दर 140 ते 150 रुपये किलो होते. सध्या गुलाब 600 रुपये किलो दराने विकला जात आहे. श्रावणात 60 रुपये किलो असलेला झेंडू सध्या 80 रुपये किलो दराने मिळत आहे. शेवंतीची 500 ते 600 रुपये किलो दराने विक्री होत आहे.
सामान्यपणे श्रावण महिन्यात फुलांचे दर वाढतात आणि गणपती बसल्यानंतर थोडे कमी होतात. मात्र, यावर्षी गणरायाचं आगमन झाल्यानंतर फुलांचे दर तीन पटीने वाढले आहेत. गणेशोत्सव आणि गौरीपुजेच्या पार्श्वभूमीवर फुलांची मागणी वाढली आहे. पण, अचानक झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी फुलशेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सध्या बाजारात फुलांची आवक कमी आहे. साहजिकच फुलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. फुलं महाग झाल्याने भाविकांच्या खिशावरील भार वाढला आहे. फुल विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक ग्राहक फुलांची खरेदी करताना हात आखडता ठेवत आहेत.





