TRENDING:

Mumbai Port: पात्रता 10वी पास, मुंबई पोर्टमध्ये तरूणांना सरकारी नोकरीची संधी...

Last Updated:

Mumbai Port Job: मुंबई पोर्टमध्ये नोकरीची संधी आहेत. 10 वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण आणि पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे. अप्रेंटिसशिप पदांसाठी ही नोकरभरती केली जात असून भरती प्रक्रिया मुंबई पोर्टकडून राबवली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई पोर्टमध्ये नोकरीची संधी आहेत. 10 वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण आणि पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे. अप्रेंटिसशिप पदांसाठी ही नोकरभरती केली जात असून भरती प्रक्रिया मुंबई पोर्टकडून राबवली जात आहे. 121 पदांसाठी केली जाणारी ही नोकर भरती बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता निकष आणि तारखांबद्दलची माहिती अर्जदारांना या बातमीमध्ये मिळेल.
Mumbai Port: पात्रता 10वी पास, मुंबई पोर्टमध्ये तरूणांना सरकारी नोकरीची संधी...
Mumbai Port: पात्रता 10वी पास, मुंबई पोर्टमध्ये तरूणांना सरकारी नोकरीची संधी...
advertisement

अप्रेंटिसशिपसाठीची भरती प्रक्रिया 9 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून 10 नोव्हेंबरपर्यंत भरती प्रक्रियेचा अखेरचा दिवस आहे. ऑनलाइन पद्धतीने अप्रेंटिसशिप पदासाठी 121 जागांसाठी भरती केली जात आहे. अप्रेंटिसशिप आणि हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी उमेदवारांची भरती केली जात आहे. पदवीधर उमेदवारांना अप्रेंटिसशिप, कॉम्प्युटर ऑप्रेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेडसाठीही अप्रेंटिसशिप उपलब्ध असणार आहे. सोबतच, हिंदी ट्रान्सलेटर ग्रेड II पदासाठीही नोकरभरती केली जाणार आहे. पदवीधर अप्रेंटिस पदासाठी 11 जागा, कॉम्प्युटर ऑप्रेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या पदासाठी 105 जागा आणि हिंदी ट्रान्सलेटर ग्रेड II पदासाठी 05 जागा असणार आहेत.

advertisement

पदवीधर अप्रेंटिसशिप आणि कॉम्प्युटर ऑप्रेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट अप्रेंटिसशिप या पदासाठी 10वी उत्तीर्ण, Computer Operator and Programming Assistant (COPA) ट्रेडचा ITI आणि कोणत्याही शाखेतील पदवी अशी शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे. हिंदी ट्रांसलेटर ग्रेड II पदासाठी उमेदवाराकडे हिंदी आणि इंग्रजी भाषेची पदवी असणे आवश्यक आहे आणि ट्रान्सलेशनच्या कामाचा 2 वर्षांचा अनुभव असावा. पदवीधर अप्रेंटिसशिप आणि कॉम्प्युटर ऑप्रेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट अप्रेंटिसशिप पदासाठीची वयोमर्यादा किमान 14 वर्षे इतकी आहे. तर, हिंदी ट्रांसलेटर ग्रेड II पदासाठीची 30 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा आहे. अनुसूचित- जाती आणि जमाती प्रवर्गासाठी 5 वर्षे आणि इतर मागास प्रवर्गासाठी 3 वर्षांची वयाची सूट दिली आहे.

advertisement

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही पद्धतीने केली जाणार आहे. पदवीधर अप्रेंटिसशिपच्या पदासाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्जप्रक्रिया करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीची PDF एकदा व्यवस्थित वाचूनच अर्ज भरावा. तर, कॉम्प्युटर ऑप्रेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट अप्रेंटिसशिप पदासाठी उमेदवारांना जाहिरातीच्या PDF मध्ये अर्ज उपलब्ध आहे. अर्जप्रक्रिया करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीची PDF एकदा व्यवस्थित वाचूनच अर्ज भरावा. अर्ज भरल्यानंतर पोस्टाने किंवा प्रत्यक्षात जाऊन अर्जदार अप्रेंटिस ट्रेनिंग सेंटर, तिसरा मजला, भंडार भवन, एन. व्ही. नाखवा मार्ग, माझगांव (पूर्व), मुंबई- 400010 या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. दोन्हीही पदांसाठी सामान्य उमेदवारांना 100 रूपये इतके अर्ज शुल्क भरावे लागणार आहे, तर अपंग व्यक्तींना अर्ज शुल्क माफ असणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला बनवा घरच्या घरी सुगंधित दिवे, अगदी झटपट होतील तयार,संपूर्ण Making Video
सर्व पहा

तर, हिंदी ट्रांसलेटर ग्रेड II पदासाठी ऑफलाईन अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर आहे. Dy. Secretary, HR Section, General Administration Department, Port House, 2nd Floor, Shoorji Vallabhdas Marg, Ballard Estate, Mumbai-400001 या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. हिंदी ट्रांसलेटर ग्रेड II पदासाठी कोणत्याही उमेदवाराला अर्ज भरावा लागणार नाही, अर्ज शुल्क माफ असणार आहे. दोन्हीही विभागांमध्ये होत असलेल्या नोकरभरतीचं ठिकाण मुंबई आहे. दोन्हीही विभागातल्या परीक्षेची तारीख अद्याप घोषित केलेली नाही. परीक्षेच्या काही दिवस आधीच उमेदवारांना परीक्षेच्या तारखा कळतील आणि हॉलतिकिट देखील उपलब्ध होतील.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Port: पात्रता 10वी पास, मुंबई पोर्टमध्ये तरूणांना सरकारी नोकरीची संधी...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल