दक्षिण आसाम आणि दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशनचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होते का ते पाहावं लागणार आहे. या सगळ्या हवामानातील बदलामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पुढचे चार दिवस होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून उष्णता वाढली आहे. रात्री देखील घामाच्या धारा निघत आहेत. हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्रातून पाऊस जाईल आणि उकाडा वाढेल, तर दक्षिणेकडे मात्र 20 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
14 ऑक्टोबर: हलका पाऊस- पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली
15 ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ,
हलका पाऊस- पालघर, ठाणे, मुंबई, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा
16 ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ,
हलका पाऊस- पालघर, ठाणे, मुंबई, नंदुरबार, जळगाव,
17 ऑक्टोबर: मुसळधार पाऊस- पालघर, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर,
हलका पाऊस- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ,