TRENDING:

विमान धावपट्टीवरुन बाजूला गेलं अन्....अजित पवारांचा अपघात कसा झाला?

Last Updated:

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात विमान अपघाताची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात विमान अपघाताची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बारामती येथील विमानतळावर लँडिंगच्या वेळी घडल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, लँडिंगदरम्यान विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती मिळत आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar
advertisement

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे आज बारामतीत चार जाहीर कार्यक्रम नियोजित होते. त्या कार्यक्रमांसाठी ते सकाळी विमानाने बारामती येथे दाखल होत होते. मात्र, विमानतळावर उतरत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने परिस्थिती अपघात झाला अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचा: अजित पवार योजना क्रॅश लाईव्ह अपडेट

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ना क्लास, ना महागडं प्रशिक्षण, ZP शाळेचे विद्यार्थी बोलतात जापनिज, कसं झालं शक्य
सर्व पहा

अपुष्ट माहितीनुसार, या घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील काही जण जखमी झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत किंवा दुखापतींच्या स्वरूपाबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रशासन किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विमान धावपट्टीवरुन बाजूला गेलं अन्....अजित पवारांचा अपघात कसा झाला?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल