TRENDING:

सुंदर परसबाग अन् डिजिटल क्लास रूम, जालन्यातील जिल्हा परिषद शाळेला मिळाला तीन लाखांचा पुरस्कार

Last Updated:

नजीक पांगरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' उपक्रमात बदनापूर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून 3 लाखांचे बक्षीस पटकाविले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी 
advertisement

जालना : राज्यातील शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन शाळांमधील गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्हा पातळीवर प्रथम येणाऱ्या शाळेत आकरा लाख रुपये तर तालुका पातळीवर प्रथम येणाऱ्या शाळेस तीन लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत जालना जिल्ह्यातील बदलापूर तालुक्यातील नजीक पांगरीची जिल्हा परिषद शाळा तालुक्यामधून प्रथम आली आहे. पाहूयात या शाळेत कोणकोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.

advertisement

बदनापूर तालुक्यातील नजीक पांगरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' उपक्रमात बदनापूर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून तीन लाखांचं बक्षीस पटकाविले आहे. राज्यातील शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्या शाळे प्रति उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्याजोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' टप्पा- 2 हे अभियान जिल्ह्यात राबविले जात असल्याचे शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी सांगितलं.

advertisement

7 वर्षांनी दिसणारं दुर्मीळ फूल महाराष्ट्रात, कास पठारावर नाही, खास ठिकाणी फुलली कारवी!

शाळेत विविध वैशिष्ट्य पूर्ण उपक्रम

या वर्षी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नजिक पांगरी या शाळेने मोठ्या उत्साहने कृतियुक्त सहभाग नोंदविला आहे. शाळेत विविध वैशिष्ट्य पूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये सुंदर परसबाग, नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र, डिजिटल क्लास रूम, बालवाचनालय, इको क्लब तसेच गणित आणि विज्ञान विषयपूरक विविध क्लब यांची स्थापना असल्याचे मुख्याध्यापक शिवाजी उगले यांनी सांगितलं.

advertisement

शाळांना प्रोत्साहित करण्याचा उद्देश

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे हा यामागचा उद्देशाने असल्याचं शिक्षणाधिकारी दातखीळ यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
सुंदर परसबाग अन् डिजिटल क्लास रूम, जालन्यातील जिल्हा परिषद शाळेला मिळाला तीन लाखांचा पुरस्कार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल