नेमकं घडलं काय?
अंबडमधील एका करिअर अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असताना महिला कॉन्स्टेबलची ओळख तिथे संशयित गोकुळ फुलसिंग बारवाल (रा. नांदी, ता. घनसावंगी) याच्यासोबत झाली होती. त्यानंतर नागपूर पोलीस दलात निवड झाल्यावर गोकुळ बारवाल याच्यासोबत बोलणे बंद झाले.
advertisement
महिला पोलीस सध्या नागपूर पोलिस दलात काम करत आहेत. गावात मुलगा पाहण्यासाठी येणार असल्याने त्या गावी आल्या होत्या. तेव्हा आरोपी प्रशिक्षक गोकुळ फुलसिंग बारवाल याने संबंधित महिला पोलिसाला कॉल करून बोलवून घेतले. “माझ्याशी लग्न कर, अन्यथा सोशल मीडियावर बदनामी करेन” अशी धमकी दिली. तसेच इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल करून बदनामी केल्याची तक्रार महिला कॉन्स्टेबलने दिली आहे.
तक्रार काय?
“मला पाहण्यासाठी मुलगा येणार असल्याने दि. 26 जानेवारी रोजी मी गावाकडे आले. तेव्हा गोकुळ बारवाल याने माझ्या मोबाईलवर फोन करून भेटायचे म्हणून बोलावून घेतले. भेटल्यानंतर त्याने ‘तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर भावाला व तुला मारून टाकीन, तुझी बदनामी करील’, अशी धमकी दिली. त्यानंतर दि. 27 रोजी इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल करून बदनामी केली,” असे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, करिअर अकॅडमीतील ओळखीतून सोबत काढलेला फोटो व्हायरल करत बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष घोडके अधिक तपास करत आहेत.






