नुकतीच जालन्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी गावात पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. तब्बल चार क्विंटल गांजाची शेतीवर छापा टाकून तो जप्त केला. तब्बल 1 कोटी रुपये एव्हढी या जप्त केलेल्या गांजाची किंमत होती.
Harbara Disease : हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव? असं करा व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
advertisement
जालना पोलिस दलाने अंमली पदार्थाची तस्करी, सेवन रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक स्थापन केलंय. या पथकाने 7843051026 हा हेल्पलाईन नं. जारी केलाय. याच नंबरवर आलेल्या कॉलमुळे ही कारवाई तडीस नेण्यात आली. पोलिसांनी एका आरोपीवर अटक केली असून तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता दहशतवाद विरोधी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी सांगितले.
कारवाईत जप्त केलेला गांजा हा सध्या पोलिस स्थानकात असून भविष्यात एका विशेष समितीच्या निगराणीखाली त्याला जाळून नष्ट केलं जाईल. अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानंतर ते न्यायालयाच्या आदेशाने नष्ट केले जातात, असं इंगेवाड यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.





