कल्याण डोंबिवलीत मांस विक्रीला बंदी घालण्यात आली. या बंदीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बाजारपेठ पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. शिवसेना ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक रुपेश भोईर, धर्मवीर खाटीक समाजाचे अध्यक्ष परवेश शेख हसीम शेख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना सकाळीच प्रतिबंधक कारवाई म्हणून या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही महापालिका प्रशासकीय इमारतीसमोर खाटिक समाज आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते जमले होते.
advertisement
कल्याण-डोंबिवलीमध्ये मांसाहार बंदीच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. स्वातंत्र्य दिनीच खाण्यावर बंधने कशी आणता असा सवाल करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, मनसे, ठाकरे गटासह इतरांनी या बंदीचा निषेध केला. आज कल्याण-डोबिंवली महापालिकेत या बंदीविरोधात आंदोलन करत मटण पार्टी करण्याचा इशारा देण्यात आला होता.
नागपूरमध्ये मांसाहार बंदी...
नागपूरमध्ये 15 ऑगस्टनिमित्त चिकन, मटण शॉप आणि कत्तलखाने बंद ठेवण्यात आली आहे. महापालिकेनं यासंदर्भात आदेश काढला होता. नागपूरच्या मटण मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. खाटिक समाजबांधवांनी महापालिकेच्या आदेशाचं पालन करत आपली दुकानं बंद ठेवली आहेत.
स्वातंत्र्यादिनानिमित्त शहरात मटणाची दुकाने बंद ठेवावी असा आदेश नाशिक महानगरपालिकेनं काढला होता. मात्र, शहरातील खाटिक समाजानं हा आदेश धुडकावून लावला. खाटिक समाजाकडून दुकानं सुरू ठेवण्यात आलीय. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मटणाची दुकाने बंद ठेवणार नाही अशी भूमिका खाटिक समाजानं घेतली.