TRENDING:

कोल्हापूरचा विषयच वेगळा, रंकाळ्यावर कुत्री आणि प्रेमीयुगुलांना नवा नियम, अजिबात ही चूक करू नका!

Last Updated:

रंकाळ्यावर गैरवर्तन करणाऱ्यांची आता खैर नाही. रंकाळा संवर्धन आणि संरक्षण समितीने पुढाकार घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : रंकाळा तलाव कोल्हापूरचे एक वैभव आहे. ऐतिहासिक, नैसर्गिक, अध्यात्मिक अशा अनेक बाबींमुळे रंकाळा तलावाला आणि आजूबाजूच्या परिसराला विशेष महत्त्व आहे. मात्र त्याच सोबत रंकाळा तलावातील पाणी प्रदूषण, सुविधांचा अभाव, वेळेवर न होणारी देखभाल दुरुस्ती अशा समस्या देखील वेळोवेळी समोर येत असतात. उद्यान आणि पदपथावर काही जणांचे गैरवर्तन आढळते. आता याच गैरवर्तनाच्या प्रकारांना रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीच्यावतीने आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

advertisement

रंकाळा संवर्धन आणि संरक्षण समिती ही रंकाळ्याच्या बाबतीत काळजी घेण्यासंदर्भात आणि जनजागृतीचे काम करते. त्यामुळे या समितीत असणारे रंकाळाप्रेमी आता रंकाळा उद्यान आणि पदपथावर नागरिकांनी अयोग्य वर्तन करु नये, यासाठी प्रयत्न करणार आहेत. रंकाळ्यावर बऱ्याचदा काही नागरिक आपले पाळीव कुत्रे फिरायला घेऊन येतात. त्याचबरोबर काहीजण रंकाळा उद्यान आणि पदपथावर सायकल घेऊन येत असतात. त्यात काहीजण तर मोटर सायकलवरून देखील जाताना रंकाळा उद्यान परिसरात यापूर्वी आढळले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या गैरवर्तनांना आळा घालणे गरजेचे आहे, असे रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीचे विकास जाधव यांनी सांगितले आहे.

advertisement

कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा नादच खुळा, एका गुंठ्यातून काढला 3 टन ऊस

राबवली जाणार मोहीम

रंकाळ्यावर कुत्रे फिरायला घेऊन येणाऱ्यांना त्याचबरोबर सायकल किंवा वाहने रंकाळा उद्यान परिसरात आणणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी रंकाळा संवर्धन आणि संरक्षण समितीकडून एक विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेद्वारे रंकाळा उद्यान आणि पदपथावर फलकांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. देवेंद्र रासकर यांनी दिली आहे.

advertisement

थांब की भावा.., नवीन वर्षात कोल्हापूरच्या लेकी उतरल्या रस्त्यावर, Video

गैरकृत्य करणाऱ्यांवर होणार कारवाई

रंकाळ्यावर बऱ्याचदा अल्पवयीन तरुण-तरुणी गैर कृत्य करताना आढळतात. त्याचबरोबर बरेचसे शाळकरी किंवा कॉलेजवयीन विद्यार्थी विद्यार्थिनी देखील शाळा, कॉलेज चुकवून रंकाळ्यावर फिरताना आढळतात. या गोष्टींना देखील रोखण्याची गरज आहे. त्यामुळेच यापुढे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शाळा कॉलेजच्या वेळेत रंकाळ्यावर आढळल्यास त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना ही गोष्ट कळवण्यात येणार आहे. प्रेमी युगुलांकडून जर गैर कृत्य करताना आढळल्यास त्यांच्यावरही कडक शासन करण्यात येणार आहे, असे धनाजी लिंगम यांनी सांगितले.

advertisement

दरम्यान, रंकाळा उद्यान, पदपथ या ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या लोकांना समजावून सांगतानाही काही वेळा वाद होतात. तर महापालिकेच्या उद्यानात वाहने किंवा पाळीव प्राणी घेऊन येण्यास बंदी असतानाही अशा प्रकारे नियम मोडले जात आहेत. त्यामुळे या बाबतीत महानगरपालिकेकडून देखील अशा नागिरकांवर दंडात्मक कारवाई व्हावी, अशी मागणीही या रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीकडून करण्यात आली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरचा विषयच वेगळा, रंकाळ्यावर कुत्री आणि प्रेमीयुगुलांना नवा नियम, अजिबात ही चूक करू नका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल