कोल्हापूर : वाढता उकाडा लक्षात घेता माणसाप्रमाणेच सर्वच पक्ष्यांनाही पाण्याची नितांत गरज असते. हे लक्षात घेऊन नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसरात चिमणीसारखे दिसणारे अनेक काळ्या, करड्या रंगाच्या पक्षांसाठी मातीची भांडी ठेवण्यात आली आहेत. वाढत्या शहरीकरणाबरोबर चिमण्यांची संख्या कमी झाली. मात्र, त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि सोबत अन्य पक्ष्यांचाही उन्हाळा सुसह्य करण्यासाठी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आणि ज्युनियर विभागाच्या वतीने जागतिक चिमणी दिनानिमित्त उपक्रम राबवण्यात आला. याबद्दल समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर महेंद्र कुमार जाधव आणि प्राध्यापक अक्षता गावडे यांनी लोकल 18 शी बोलताना यासंदर्भात माहिती दिली आहे.
advertisement
शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. चिमणीसारखे दिसणारे अनेक काळ्या, करड्या रंगाचे पक्षी सध्या आपल्या विद्यापीठाच्या प्रांगणात आढळतात. पण चिमणी नजरेस पडणे दुर्मिळ झाले आहे. वाढता उकाडा लक्षात घेता माणसाप्रमाणेच सर्वच पक्ष्यांनाही पाण्याची नितांत गरज असते. त्यामुळे नाईट कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्सच्या समाजशास्त्र विभागाकडून मातीची भांडी ठेवण्यात आली आहेत. चिमण्या कमी होण्याचे कारणशहरी भागातून चिमण्यांची संख्या कमी होण्याचे नैसर्गिक कारण आहे. वाडे, बैठी घरे किंवा चाळींऐवजी आता बहुसंख्य ठिकाणी अपार्टमेंट, सोसायटी असते. या इमारतींच्या आवारात फरशी किंवा पेव्हिंग ब्लॉक घातले जातात. याचाच चिमण्यांच्या वावरण्यात अडथळा ठरत आहे. त्यामुळं विद्यापीठ परिसरात हा उपक्रम राबवल्याच प्राध्यापक डॉ. जाधव आणि प्राध्यापिका डॉक्टर अक्षता गावडे यांनी सांगितलं.
काम नाही म्हणून रडताय? सागरचा हा संघर्ष बघा, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!
चिमण्यांचे शहरातील वास्तव्याचे प्रमाण कमी येण्याचे कारण काय ?
चिमण्या चार प्रकारची आंघोळ करतात. पंखांनी पाणी अंगावर घेतात, त्यामुळे पंखातील किडे मरतात. सूर्यप्रकाशात पंख फडफडवून प्रकाश पंखात साठवून घेतात. माती किंवा चिखलामध्ये अंग घासतात आणि चोचीत मुंग्या पकडून त्यांच्यातील दव पदार्थ पंखांवर टाकतात. अशा चार प्रकारे चिमण्या आपले अंग स्वच्छ करतात. मात्र, त्यांना पाण्याचा साठा आढळत नाही. सार्वजनिक नळ कोंडाळी नसल्यामुळे त्यावर बसून पाणी पिताही येत नाही आणि अंगावर घेता येत नाही. कोणत्याही अंगणात फरशा आढळतात त्यामुळे चिमण्यांना पाणी, चिखल या गोष्टी सहसा शहरात आढळू शकत नाहीत. म्हणून त्यांचे शहरातील वास्तव्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.
जगभरात 26 जातीच्या चिमण्या
जगभरात 26 जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या 26 पैकी केवळ 23 चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत. भारतात पाच प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात. त्यामध्ये, स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचादेखील समावेश आहे. याशिवाय, जगातही 24 प्रकारच्या चिमण्या आढळून येतात. यापैकी बहुतांश प्रजातींची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. 101 पक्ष्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, ज्यामध्ये चिमणी या पक्षाचा समावेश आहे.





