कोल्हापूर : कोल्हापुरातल्या महापुराचा फटका प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाला आहे. बऱ्याच ठिकाणी शेत पीक पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले, रस्ते बंद झाल्यामुळे एसटी महामंडळाचे लाखोंचे नुकसान झाले, दूध संकलनावर परिणाम झाला, घरात आणि दुकानात पाणी साचून प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या पट्टणकोडोली गावामध्ये काही घरांची आणि एका पोल्ट्री फार्मची पडझड झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात देखील केला काही दिवसात पावसाचा जोरदार तडाखा बसलेला पाहायला मिळाला. याच तालुक्यातील पट्टणकोडोली गावात देखील मुसळधार पावसामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यातच काही घरांचे नुकसान झाले असून नागरिक आपला घर-संसार सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
काय काय झाले नुकसान
पट्टणकोडोली गावाला पावसाने झोडपून काढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी याचा परिणाम पाहायला मिळाला. गावातील 5 ते 6 घरांची मोठी पडझड झाली आहे. तर गावातीलच सांगवडी पाणंद भागातील एका पोल्ट्री फार्मच्या शेडची भिंत कोसळली आहे. त्यामुळे सर्वांचे मिळून एकूण साधारणतः 6 लाखांच्या आसपास आर्थिक नुकसानीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
कोल्हापुरातील कित्येक हेक्टर ऊस पुराच्या पाण्यात, पाहा कसे कमी करता येऊ शकते होणारे नुकसान
सानुग्रह अनुदानाची मागणी
नुकसान झालेल्या कुटुंबातील नागरिकांची परिस्थिती ही सामान्यच आहे. त्यामुळे पावसामुळे झालेले हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना पुढे बराच काळ द्यावा लागेल. म्हणूनच शासनाने नुकसान भरपाई म्हणून सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी यानिमित्ताने पट्टणकोडोली गावच्या सरपंच भाग्यश्री कोळी यांनी केले आहे.
सुधारत आहे कोल्हापूरची पूर परिस्थिती
सध्या कोल्हापुरात आलेल्या महापुराची परिस्थिती सुधारू लागली आहे. पंचगंगेने 43 फुटांची धोका पातळी गाठल्यानंतर 47 फुटांवर पंचगंगा नदीची पाणी पातळी केली होती. मात्र आता सर्वत्र हळूहळू पाणी ओसरू लागले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात आणि जिल्हाभरात पावसाने उघडेल दिल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. तर वाढलेली पाणी पातळी ही प्रत्येक इंचाने अगदी संथगतीने कमी होत आहे.
नाद खुळा! शेतकरी कारमधून विकतो भाजी, लोक बघतच बसतात; उलाढाल लाखोंची
दरम्यान पट्टणकोडोली येथील झालेले घरांचे नुकसान हे फक्त उदाहरण असून याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी पडझड झाली असून त्या नागरिकांचे देखील आर्थिक नुकसान झालेले पाहायला मिळत आहे.