कोल्हापूर: येथील चित्रकार माधुरी पाटणकर यांनी वाराणसी येथे झालेल्या वाराणसी आर्ट कॅम्पमध्ये सहभाग घेतला.वाराणसी येथे जलतरंग लँडस्केप पेंटिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत पद्मश्री वासुदेव कामत, प्रफुल्ल सावंत, विक्रम शितोळे, निशिकांत पालांडे इत्यादी नामवंत कलाकारासह देश-विदेशातून 100 कलाकार सहभागी होते. कलारंभ आयोजित स्पर्धेत बक्षिस मिळाल्यामुळे श्रीमती पाटणकर यांना वाराणसी शिबीरात सहभागी होण्याची संधी मिळाली.
advertisement
श्रीमती माधुरी पाटणकर यांनी कोल्हापुरातील कलानिकेतन येथून जी.डी. आर्ट्स पदवी मिळवली आहे. त्यांनी बॉम्बे आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, स्टेट आर्ट एक्झिबिशन ऑफ महाराष्ट्र, खजुराहो इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवल, दिल्ली फेस्टीव्हल, पाचगणी फेस्टिवल इत्यादीमध्ये सहभाग झाले आहेत. त्यांच्या कलाकृतींना विविध ठिकाणी पारितोषिके मिळाली आहेत.
