कसा असेल पर्यायी मार्ग?
दाजीपूर ते राधानगरी मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे. दाजीपूर ते राधानगरी रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करून हलक्या व लहान वाहनांकरीता बालिंगा- महे पाटी- कोते- धामोड- शिरगाव- तारळे- पडळी- कारीवडे- दाजीपूर रस्ता प्रजिमा 29 चा वापर करावा.
यंदाचा गुढीपाडवा 4 राशींचा, मराठी नववर्ष ठरेल यशाची नांदी, नशीब फळफळेल सुखांनी!
advertisement
तसेच अवजड आणि मोठी वाहतूक या रस्त्यावरून पूर्णपणे बंद करून कोकणातून कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा- नांदगाव- तळेरे- वैभववाडी- गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळवण्यात येणार आहे. तर कोकणातून कोल्हापूरकडे येणारी वाहने नांदगाव फाटा वैभववाडी गगनबावडा मार्गे कोल्हापूरकडे वळविण्यात येणार आहेत. तसेच कर्नाटकातून कोकणात जाणारी वाहने आंबोली आजरा गडहिंग्लज आणि संकेश्वर गडहिंग्लज आजरा आंबोली अशी वाहने वळवण्यात येणार आहेत.
कधीपासून अंमलबजावणी?
10 मार्च ते 30 एप्रिल या 45 दिवसाच्या कालावधीत राधानगरी ते दाजीपूर रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करून सदरची वाहतूक प्रस्तावित केल्याप्रमाणे वळवण्यात येणार आहे. जनतेच्या व वाहन चालकाच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशादर्शक चिन्हे व माहिती लावण्यात यावी अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.






