कोल्हापूर : कोल्हापूर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे. पावसाळ्यात अनेक धबधबे या ठिकाणी पर्यटकांना साद घालत असतात. मात्र, धबधब्यांच्या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटनांमुळे बरेच जण अशा ठिकाणी जायचे धाडस करत नाहीत. अशा पर्यटकांसाठी अगदी सुरक्षित आणि तितकाच मनमोहक असा कागलचा कृत्रिम धबधबा हा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील आणि कोल्हापूर बाहेरच्या पर्यटकांना परिवारासह धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हे एक सुरक्षित ठिकाण म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील स्वर्गीय व्ही. ए. घाटगे पाझर तलाव परिसरात तलावाच्या सांडव्यालाच एक कृत्रिम धबधब्याचे रुप देण्यात आले आहे. जिल्ह्यासह कागल तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव लवकर भरल्याने हा धबधबा प्रवाहित झाला आहे. नगरपालिकेचा हा धबधबा आता नवीन पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे जिल्हा आणि परिसरातील नागरिक याठिकाणी धबधब्याच्या पाण्यात भिजण्यासाठी येऊ लागले आहेत.
Satara News : अतिवृष्टीमुळे चारा पिकाचे नुकसान, कोरेगावातील बळीराजा हवालदिल, धक्कादायक परिस्थिती
नुकतेच झाले धबधब्याचे सुशोभीकरण -
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून या तलावात नगरपालिकेने हा कृत्रिम धबधबा निर्माण केला आहे. स्व. व्ही. ए. घाटगे पाझर तलावाचे सुशोभीकरणावेळी हे करण्यात आहे. यासाठी तब्बल 10 कोटींचा निधीदेखील खर्च केला गेला आहे. कोल्हापूर शहरातील पर्यटन वाढविण्यासाठी या सुविधा करण्यात आल्या आहेत.
धोकादायक धबधब्यांपेक्षा हा कृत्रिम धबधबा बरा -
यंदा मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यात धबधब्याच्या ठिकाणी होत असलेल्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळेच ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील धबधबे पाहण्यासाठी प्रशासनाने मज्जाव केला आहे. मात्र, या पाझर तलावाच्या ठिकाणी पर्यटकांसाठी नौकानयन, संगीतावरील कारंजे, कृत्रिम धबधबा आणि रेन डान्स अशा सोयी पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे परिवारासह धोकादायक ठिकाणी धबधबा पाहायला जाण्यापेक्षा हा कृत्रिम धबधबाच भरपूर आनंद देत असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
रात्री झोपण्यापूर्वी कोणते खाद्यपदार्थ अजिबातच खाऊ नयेत?, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
कसे जाल या धबधब्याच्या ठिकाणी -
स्व. व्ही. ए. घाटगे पाझर तलाव हा कागल शहराच्या परिसरातच आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकापासून साधरण 16 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून कोल्हापूर विमानतपासून फक्त 13 ते 15 किलोमीटर अंतर गेल्यानंतर या धबधब्याच्या ठिकाणी पोहोचता येते.