रात्री झोपण्यापूर्वी कोणते खाद्यपदार्थ अजिबातच खाऊ नयेत?, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
- Reported by:Kale Narayan
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
बरेच जण रात्री जेवण लवकर करतात. मात्र, टीव्ही, मोबाईल पाहण्यात व्यस्त असल्याने जेवणानंतर आईस्क्रीम, मिल्क शेक, शुगर कँडी असे पदार्थ घेतात त्याचबरोबर रात्री दूध घेणारेही अनेक जण आहेत.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : बदलत्या जीवन पद्धतीनुसार आपल्या खानपानाच्या पद्धतीमध्येही बरेच बदल झाले आहेत. हल्ली जेवणानंतर वेगवेगळी पेय खाद्यपदार्थ तसेच गोड पदार्थ खाण्याचा ट्रेंड वाढत आहे. यामध्ये आईस्क्रीम, मिल्क शेक, दूध, कॉफी इत्यादी खाद्यपदार्थ आणि पेय यांचा समावेश होतो. मात्र, हे खाद्यपदार्थ आपल्या चयापचय क्रियेवर परिणाम करतात. यामुळे अपचन, लठ्ठपणा, हृदयाचे आजार यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे रात्री जेवण केल्यानंतर कोणते खाद्यपदार्थ घेणे टाळावे, याबाबत ओबीसीटी कन्सल्टंट डॉ. अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्या सर्वांना आहार आणि इन्सुलिन याचा संबंध आहे हे माहीत असेलच. सकाळी उठल्यानंतर इन्सुलिनचं सिक्रेशन सुरू होते. दुपारच्या वेळी इन्सुलिन सिक्रेशन सगळ्यात जास्त पातळीवर असते तर सायंकाळी आणि रात्री ते सर्वात कमी असते. यामुळे रात्री सात वाजेच्या आसपास आपण रात्रीचे जेवण करायला हवे.
Satara News : अतिवृष्टीमुळे चारा पिकाचे नुकसान, कोरेगावातील बळीराजा हवालदिल, धक्कादायक परिस्थिती
बरेच जण रात्री जेवण लवकर करतात. मात्र, टीव्ही, मोबाईल पाहण्यात व्यस्त असल्याने जेवणानंतर आईस्क्रीम, मिल्क शेक, शुगर कँडी असे पदार्थ घेतात त्याचबरोबर रात्री दूध घेणारेही अनेक जण आहेत. असे गोड खाद्यपदार्थ जेवणानंतर घेतल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे निद्रानाश होण्याची शक्यता असते असे कुलकर्णी यांनी सांगितले.
advertisement
रात्रीच्या वेळी दूध घेतल्याने लिव्हर संथ गतीने काम करते. त्याचबरोबर दूध पचनास जड आहे. त्यामुळे आपली पचन क्रिया बिघडते म्हणून रात्रीच्या वेळी दूध घेणेदेखील टाळायचे आहे. याचबरोबर रात्री अल्कोहोल घेणेदेखील टाळणे आरोग्यासाठी उत्तम आहे. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अॅसिडिक पदार्थ असल्याने याचे सेवनही रात्रीच्या वेळी टाळायचे आहे. यामुळे अॅसिडिटी, जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
advertisement
सायंकाळच्या वेळी कॉफी घेण्याची शौकिन देखील अनेक जण असतात. कॉफीमुळे आपला ब्रेन हा अलर्ट राहतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी 6 ते 7 तास आधी कॉफी घेणे टाळायचे आहे. याचबरोबर कॉफी असलेले चॉकलेट्स आणि इतर खाद्यपदार्थही टाळायचे आहेत. रात्रीच्या वेळी आपली पचनशक्ती अतिशय कमी झालेली असते त्यामुळे रात्री तळलेले पदार्थ, पिझ्झा, पास्ता, साबुदाणा यासारखे खाद्यपदार्थ सेवन करणेही टाळणे उत्तम आरोग्यासाठी गरजेचे आहे, अशी माहिती ओबीसीटी कन्सल्टंट अमृता कुलकर्णी यांनी दिली.
advertisement
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Aug 01, 2024 1:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
रात्री झोपण्यापूर्वी कोणते खाद्यपदार्थ अजिबातच खाऊ नयेत?, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती





