स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात अजित पवार गटामध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. यावेळी आदित्य तटकरे उपस्थितीत होत्या. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना आदिती तटकरेंनी लाडकी बहिण योजनेच्या केवायएसीबद्दल माहिती दिली.
'मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, लाडकी बहिण योजनेसाठी केवाएसी सुरू आहे. ज्या काही अडचणी आल्या होत्या, त्या आता दूर केल्या जात आहे. सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. दररोज ३ ते ४ लाख महिलांचं ई केवायएसी होत आहे. आतापर्यंत जवळपास १ कोटी १० महिलांचं ई केवीएसी पूर्ण झालं आहे. चाळीस लाख महिलांची ई केवायएसीची 90% पर्यंत पुरता झालेली आहे आणि पुढील दोन महिने आम्ही सांगितले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंतचा अवधी आहे. दीड महिन्याचा वेळ दिला आहे. ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे. त्या भागातील महिलांना १५ दिवसांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे, असं आदिती तटकरेंनी सांगितलं.
advertisement
महिलांना मासिक पाळी रजा निर्णय
' कर्नाटक सरकारने महिलांना मासिक पाळीत १२ दिवसांची रजा देण्याचा निर्णय घेतला आहे, राज्यात असा निर्णय लागू होईल का, असं विचारलं असता आदिती तटकरे म्हणाल्या की, 'आता आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत. त्या राज्यामध्ये भौगोलिक परिस्थिती त्यासोबतच अनेक समीकरण आहेत. ते बघून निर्णय घेतले जातात. आपण एकीकडे बोलतो की, महिला सक्षमीकरणाकडे जोर चाललेला आहे आणि महिलाही सक्षम आहे. महिला कुठेही कुठल्या क्षेत्रात काम करत असू दे आणि त्यांना वाटू नये की, त्या कंपनीचा नुकसान होईल, त्यामुळे महिलांनी मासिक पाळीबद्दल निर्णय घेतला असावा. जर कुठे विरोध झाला तर त्या ठिकाणी आम्ही सरकार म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून संयुक्तिक असेल तर माहिती म्हणून निर्णय घेऊ, असंही त्यांनी आश्वासन दिलं.
शिक्षकांच्या बदल्या करणार आहात का?
माझ्या बाजूने मी सांगतो त्यांचा काहीतरी गोंधळ झाला आहे. कारण मी ज्या ठिकाणांबद्दल बोललेले आहे त्या ठिकाणी अत्यंत दुर्गम भाग आहेत. अनेक लोकांच्या बदल्या दूरवर झालेल्या आहेत आणि त्या शिक्षकांच्या बदल्यात त्या ठिकाणाहून केल्या आणि दुसरा ठिकाणी जाताना कामासाठी पाठवलं तर तेथील परिस्थिती शाळेतील वेगळी होईल त्या ठिकाणी शाळेत शिक्षक राहणार नाही आणि विनाशिक्षक शाळा बंद होतील आम्ही दुर्गम भागामध्ये पट आणि शाळा टिकवण्याचं काम करतोय, असंही तटकरेंनी सांगितलं.