TRENDING:

Maharashtra Guardian Minister List : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संभाव्य पालकमंत्री यादी आली समोर, वाचा एका क्लिकवर...

Last Updated:

Maharashtra Guardian Minister List : महायुतीमध्ये खातेवाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता मात्र, सरकारचे हेडमास्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अजित मांढरे, प्रतिनिधी, मुंबई : राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कोणत्या मंत्र्यांला कोणते खाते मिळणार हा ही विषय संपुष्टात आला तोच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न चर्चेला आला होता. महायुतीमध्ये खातेवाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता मात्र, सरकारचे हेडमास्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे.
Maharashtra Guardian Minister List  check details here
Maharashtra Guardian Minister List check details here
advertisement

पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाल्याचे चित्र होते. काही जिल्ह्यांवर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी दावे केले होते. तर, काही जिल्ह्यांवर दोन पक्षांमध्ये चढाओढ लागली होती. यावरून दावे-प्रतिदावे सुरू होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आहे. सर्वांची नाराजी मान पान सांभाळून आणि आगामी पालिका निवडणुकांचे गणित लक्षात घेऊन पालकमंत्री निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी चर्चा करून तोडगा काढला.

advertisement

महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी बैठकांनंतर पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली आहेत. तसंच पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार असल्याची शक्यता आहे. या शक्यता लक्षात घेऊनच तिन्ही पक्षांनी आपल्याकडे महत्त्वाचे जिल्हे यावेत यासाठी जोर लावला. अशातच आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे.

>> तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

> नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे

advertisement

> ठाणे - एकनाथ शिंदे

> पुणे - अजित पवार

> बीड - अजित पवार

> सांगली - शंभूराज देसाई

> सातारा - शिवेंद्रराजे भोसले

> छत्रपती संभाजी नगर - संजय शिरसाठ / अतुल सावे

> जळगाव - गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे

> यवतमाळ - संजय राठोड / भाजपाचा दावा देखील आहे

advertisement

> कोल्हापूर - हसन मुश्रीफ

> अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील

> अकोला - माणिकराव कोकाटे

> अमरावती - चंद्रकांत पाटील

> भंडारा - राष्ट्रवादी अजित पवार

> बुलढाणा - आकाश फुंडकर

> चंद्रपूर - नरहरी झिरवळ

> धाराशीव - धनंजय मुंडे

> धुळे - जयकुमार रावल

> गडचिरोली - एकनाथ शिंदे

advertisement

> गोंदिया - राष्ट्रवादी अजित पवार

> हिंगोली - आशिष जैस्वाल

> लातूर - गिरीष महाजन

> मुंबई शहर - योगेश कदम

> मुंबई उपनगर - मंगलप्रभात लोढा

> नांदेड - भाजपाकडे राहिल

> नंदुरबार - भाजपाचा दावा

> नाशिक - दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा

> पालघर - गणेश नाईक

> परभणी - मेघना बोर्डीकर

> रायगड - भरत गोगावले / राष्ट्रवादीचा दावा कायम

> सिंधुदुर्ग- नितेश राणे

> रत्नागिरी - उदय सामंत

> सोलापूर - जयकुमार गोरे

> वर्धा - पंकज भोयर

> वाशिम - माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक

> जालना - अतुल सावे

> लातूर - बाळासाहेब पाटील

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Guardian Minister List : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संभाव्य पालकमंत्री यादी आली समोर, वाचा एका क्लिकवर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल