TRENDING:

Manoj Jarange Patil : पोलिसांना सांगून तुम्ही पोरांवर लाठीमार कराल, पण त्यानंतर..., जरांगेंचा इशारा

Last Updated:

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष निर्माण होणार का, याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच आज मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पोलिसांना सांगून तुम्ही पोरांवर लाठीमार कराल, पण त्यानंतर..., जरांगेंचा इशारा
पोलिसांना सांगून तुम्ही पोरांवर लाठीमार कराल, पण त्यानंतर..., जरांगेंचा इशारा
advertisement

मुंबई: आझाद मैदानातील आंदोलनात अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. आझाद मैदान मोकळं करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. तर, दुसरीकडे सोमवारच्या सुनावणीत हायकोर्टाने दक्षिण मुंबईतील इतर भागांमधून आंदोलकांना हटवण्याबाबतची सूचना केली आहे. या घडामोडी दरम्यान आता मराठा आरक्षण आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष निर्माण होणार का, याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच आज मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

advertisement

मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. सोमवारपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण तीव्र करत पाणी पिणेदेखील बंद केले आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या नोटिसीवर जरांगे यांनी आज सकाळी भाष्य केले, मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सरकार कुठल्याही थराला गेले तर मी कोणत्याही टोकाला जायला तयार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला.

advertisement

पोरांवर लाठीमार कराल तर...

मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांन शांत राहण्याचे आवाहन केले. काहीही झाले तरी शांत रहायचे. मी मेल्यानंतरही तुम्ही शांत रहा. तुम्हाला काय करायचे तुम्ही पाहा. मरेपर्यंत मी मुंबई सोडणार नाही देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगतो असेही त्यांनी म्हटले.

advertisement

जरांगे यांनी म्हटले की, तुम्ही जर पोरांवर लाठीमार केला तर तो सर्वांत मोठा डाग असेल. तुमच्या लोकांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे. तुमच्या नेत्यांना आणि लोकांना राज्यात फिरायचे आहे हे लक्षात ठेवा असा इशाराही त्यांनी दिला. पोलिसांकडून त्यांचा अपमान होऊ देऊ नका. तसे झाले तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल. त्यामुळे गोडीत जे करता येईल ते करा. तुम्ही ज्यांच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास साडे 9 पट जास्त आहे. जिकडे घुसायचे नाही तिकडे घुसू नका असा निर्वाणीचा इशाराही जरांगे यांनी दिला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : पोलिसांना सांगून तुम्ही पोरांवर लाठीमार कराल, पण त्यानंतर..., जरांगेंचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल