याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तातडीने बोलवलेल्या बैठकीत आयुक्त राव यांनी ठाणे शहरातील अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेतला. ज्या धोकादायक इमारतींची दुरुस्ती होऊ शकते, अशा इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधण्याचे निर्देश राव यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. अतिधोकादायक इमारती सोडण्यासाठी रहिवाशांना तयार करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असंही आयुक्त राव म्हणाले.
Panvel News: महापालिकेने दिलेल्या नाश्त्यात सापडल्या अळ्या! ठेकेदाराने दिलं अजब स्पष्टीकरण
advertisement
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगररचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त सचिन सांगळे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
दरम्यान, गणेशोत्सवानंतर ठाणे महानगपालिका पुन्हा अॅक्शनमोडमध्ये येणार आहे. गणेशोत्सवानंतर शहरातील अनधिकृत इमारतींवर बुलडोझर चालवलं जाणार आहे. या कारवाईसाठी यापूर्वीच तयारी झाली असून गणेशोत्सवामुळे ही कारवाई काही दिवस लांबणीवर टाकण्यात आली आहे.