नागपूर हा भाजपला बालेकिल्ला असून अनेक वर्षे तिथे भाजपची सत्ता आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपने मोठी खेळी खेळली आहे. एक म्हणजे भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे मुख्य कार्यालय असलेल्या रेशीमबागेची जागा भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडली आणि मोमिनपुरा प्रभागातून कामिल अन्सारी यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपकडून ते एकमेव मुस्लिम उमेदवार आहेत. हिंदू–मुस्लिम सलोखा आणि सामाजिक ऐक्यासाठी ओळखले जाणारे कामिल अन्सारी नागपूर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे कामील अन्सारी यांचं म्हणणे आहे. त्यांची उमेदवारी नागपूरच्या बदलत्या राजकीय समीकरणांकडे लक्ष वेधणारी आहे. त्यामुळे राज्यात ज्यांची सध्या चर्चा सुरू आहे असे कामिल अन्सारी आहेत तरी कोण? याविषयी जाणून घेऊया
advertisement
कोण आहेत कामिल अन्सारी?
- कामिल अन्सारी हे बुनकर ओबीसी असून ते ‘पसमांदा मुस्लिम’ समुदायाशी संबंधित आहेत.
- माजी मंत्री दत्ता मेघे यांना ते आपले राजकीय गुरु मानतात. आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वाखालील तिरुपती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे ते संचालक आहेत.
- अन्सारी यांनी क्रीडाप्रेमी असून कुस्ती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामुळे शहरात त्यांची ओळख ‘कामिल पैलवान’ म्हणून आहे.
- यंग मुस्लिम फुटबॉल क्लबमध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
भाजपकडून उमेदवारी का?
भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याबाबत आणि मुस्लिम मतदारांच्या पाठिंब्याबाबत विचारले असता, कामिल अन्सारी स्पष्टपणे सांगतात, मी सर्वात प्रथम या देशाचा नागरिक आहे. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नागपूर शहराचा विकास केला. नागपूर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या रिंगणात मी उतरलो आहे. मुस्लिम समाज बदलत आहे, आता धर्माचे नाही तर विकासाचे राजकारणावर त्यांचा विश्वास आहे.
नागपूरमध्ये कोणत्या पक्षाचे किती मुस्लिम उमेदवार?
नागपूर मनपा निवडणुकीत काँग्रेसने 11 मुस्लिम उमेदवारांना , बहुजन समाज पक्षाने 3 तर एआय-एमआयएम कडून सर्व 17 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.
हे ही वाचा :
