नागपूर : नागपूरसह विदर्भात मान्सुनच्या पावसाने राज्यातील बराचसा भाग व्यापला आहे. काल पश्चिम विदर्भात मंगळवारी पावसाने प्रवेश केला. मात्र, पूर्व विदर्भात अजूनही उन्हाचा तडाखा कायम आहे. येत्या काही दिवसांत पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस येईल. पण उपराजधानी असलेल्या नागपूरला अजुनही पावसाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या पावसाचा वेग 15 जूननंतरच वाढण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ याठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, पूर्व विदर्भ आणि मुख्यत: नागपूरला आणखी काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे. प्रादेशिक हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 14-15 जूनच्या दरम्यान शहरात पाऊस अपेक्षित आहे.
advertisement
हळदीचा टिळा लावल्याने बदलणार तुमचं नशीब, आहेत खूपच महत्त्वाचे फायदे, एकदा वाचाच..
मुंबई शहरात अरबी समुद्राकडून पावसाचे वारे वाहतात. तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून पाऊस प्रवेश करतो. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पाऊस अडकला आहे. बंगालच्या उपसागरावरील कमकुवत पावसाच्या वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. तसेच शहरात 22-23 जूननंतरच चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Thane News : ठाण्यात पाणीकपातीचं संकट, जून महिन्याचा पंधरवडा आला तरी प्रश्न सुटेना
नागपुरात पुन्हा तापमान 45 अंशांवर गेले आहे. नागरिक या उकाड्याने हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे विदर्भ वगळता राज्याच्या बहुतेक भागात पाऊस पोहोचल्यामुळे कमाल तापमान सरासरी 30 अंश सेल्सिअसवर खाली आले आहे. मात्र, विदर्भात पारा अधिकच वाढत आहे. मंगळवारी विदर्भातील ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे 45.3 इतक्या राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्या मागोमाग विदर्भात चंद्रपूर 42.8, गडचिरोली 42.0, नागपूर 42.4, वर्धा 42.0, यवतमाळ 41.0 आणि भंडाऱ्यात 42.4 अंश कमाल तापमान नोंदविले गेले.