पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या वस्त्या पुढीलप्रमाणे आहेत
सुभाननगर जलकुंभ अंतर्गत येणाऱ्या साईनगर, नेताजीनगर, म्हाडा कॉलनी, विजयनगर, निवृत्तीनगर, भारतनगर, लक्ष्मीनगर, गुलमोहरनगर, भगतनगर, महादेवनगर, भारतवाडा, दुर्गानगर, गुजराती कॉलनी, चंद्रानगर, जुनी पारडी, एचबी टाऊन, आभा कॉलनी, शिक्षक कॉलनी, ओमनगर, तलमलेनगर या वस्तीमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
advertisement
मिनीमाता जलकुंभ अंतर्गत येणाऱ्या मिनीमातानगर, जानकीनगर, पाच झोपडा, जलारामनगर, सूर्यनगर, एसआरए योजना, महाजनपुरा, खाटीकपुरा, कोष्टीपुरा, दीपनगर, शेंडेनगर, अंबेनगर, विनोबा भावे नगर, बीएच दुर्गा नगर, गोंड मोहल्ला, उडिया मोहल्ला, गजानन मंदिर परिसर, हनुमाननगर, ठाकूरवाडी, सदगुरूनगर, राणी सती सोसायटी या भागांतही पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पारडी जलकुंभ अंतर्गत येणाऱ्या अशोकनगर, मोरकर वाडी, सुभाष मैदान, शारदा चौक, गंगाबाग, दत्त चौक, भवानीनगर, घाटाटेनगर, राममंदिर परिसर, शिवनगर, नवीननगर, श्यामनगर, दुर्गानगर, शिवशक्तीनगर, भारतवाडा, पुनापूर वस्ती, भोलेश्वर सोसायटी, रेणुकानगर या ठिकाणी सुद्धा 15 ऑक्टोबर रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
भांडेवाडी जलकुंभ अंतर्गत येणाऱ्या पवनशक्तीनगर, अब्बूमियाँनगर, तुलसीनगर, अंतुजीनगर, मेहरनगर, साहीलनगर, सरजू टाऊन, वैष्णोदेवीनगर, श्रावणनगर येथेही पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
आमहानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. नागरिकांनी संयम बाळगावा, तसेच शटडाऊन काळात पाणी वाया घालवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.