या मतदारसंघात डॉक्टर विरुद्ध वकील अशा दोन उमेदवारांमध्ये सामना रंगला. शिवाय यंदा या मतदारसंघात मतदानच्या टक्केवारीत देखील वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. याचा फायदा कोणाला झाला, हे आता समोर येणार आहे..
Loksabha Election Results 2024 : निकालाचा पहिला कल हाती; महाराष्ट्रात भाजपची आगेकूच
भाजपच्या महायुतीची उमेदवार डॉ. हीना गावित यांना विजयाची हॅटट्रिक मारता आली की कधीकाळी काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गोवाल पाडवी यांनी बाजी मारली, हे आता समोर येणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडलं आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला.
advertisement
मात्र आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यावर्षी झालेल्या निवडणुकीत मोठ्या चुरशीची लढत पाहण्यास मिळाली. काँग्रेसकडून नवखा चेहरा असलेले गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपाकडून विद्यमान खासदार हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची जाहीर सभा नंदुरबार मध्ये झाली. याचा नेमका कोणाला फायदा झाला? हे आता समोर येत आहे.