नाशिकमधील दोन तरुणींनी सोशल मीडियावर धमकी देणारा एक रील तयार करून पोस्ट केली होती. 'हे नाशिक आहे भावा, तू येथे इज्जत दिली तर तुला इज्जतच भेटेल, नाही तर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिविलला भेटंल' #नाशिक असे या रीलमध्ये म्हटले आहे. या वक्तव्यानंतर रील झपाट्याने व्हायरल झाला आणि त्यावरून मोठी चर्चा रंगली. रीलमध्ये गुन्हेगारी आणि धमकीचा सूर असल्याने पोलिसांनी या व्हिडीओची गंभीर दखल घेतली.
advertisement
नाशिक पोलिसांनी शिकवला धडा
नाशिक पोलिसांच्या सायबर सेल आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ कारवाई करत या दोन्ही तरुणींना शोधून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून चौकशी केली असून अशा प्रकारे समाजात भीती निर्माण करणारे किंवा गुन्हेगारी वर्तनाचे प्रदर्शन करणारे रील्स तयार करणे कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी धडा शिकवण्यासाठी या मुलींचा एक व्हिडीओ तयार केला यामध्ये स्वत: त्या मुलींनी असे व्हिडीओ न करण्याचे आवाहन केले आहे. महिला असो की पुरुष कायद्याचे उल्लंघन केले तर फटके पडणारच, असे नाशिक पोलीसांनी म्हटले आहे.
नाशिक पोलिसांच्या कारवाईचे कौतुक
नाशिक पोलिसांनी याप्रकरणी इशारा दिला आहे की, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा रील्स तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. 'खाकी दाखवतात नाशिक जिल्हा कायद्यांचा बालेकिल्ला आहे,' असे उद्गार पोलिसांनी काढत नागरिकांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, नाशिक पोलिसांच्या कारवाईचे कौतुक नागरिकांकडून होत आहे.