पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये असलेल्या 'निखिल कानेटकर बॅडमिंटन अॅकॅडमी'मधून सुकांतच्या क्रीडा प्रवासाला सुरुवात झाली. सुकांतची कारकिर्द अतिशय संघर्षमय आहे. शारीरिक अडचणीवर मात करत त्याने बॅडमिंटन सारख्या कठीण खेळात स्वतःचं वेगळे स्थान निर्माण केलं. 2014 पासून सुकांतने पॅराऑलिम्पिक्स, एशियन गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप अशा अनेक जागतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.
Rangoli Art: अबब! तब्बल 2 टनाची रांगोळी, पुणेकरांचा भीमपराक्रम, सगळे पाहतचं राहिले!
advertisement
वेल्स, स्कॉटलंड, चीन, इंडोनेशिया अशा विविध देशांमध्ये जाऊन सुकांतने चमकदार कामगिरी केली आहे. सुकांत म्हणाला, 'मी नेहमीच माझ्या खेळातून उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या आजपर्यंतच्या प्रवासात माझ्या कुटुंबाने मला नेहमीच बळ देण्याचं काम केलं आहे. जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान पटकवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून मी मेहनत घेत आहे. भविष्यातील स्पर्धांमध्ये मी आणखी चांगला खेळ करण्यासाठी उत्सुक आहे."
2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये त्याने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. सुकांतने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत मेन्स सिंगल प्रकरात तीन वेळा ब्राँझ मेडल जिंकली आहेत. याशिवाय, एशियन गेम्समध्ये सिंगल्स प्रकारात ब्राँझ मेडल आणि डबल्स प्रकारात ब्राँझ मेडल जिंकली आहेत.
युवा खेळाडूंना प्रशिक्षण
सुकांत पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुल येथे असलेल्या निखिल कानेटकर बॅडमिंटन अॅकॅडमीमध्ये सराव करतो. सरावासोबतच तो अॅकॅडमीमधील इतर युवा खेळाडूंना अनेक वर्षांपासून प्रशिक्षण देखील देत आहे.