आतापर्यंत गोट्या खेळत होता का?
एका व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यानंतर रोहित पवार भडकले. मोघम उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्याची रोहित पवार यांनी कानउघडणी केली. आतापर्यंत गोट्या खेळत होता का? तक्रार करणारे नागरिक बावळट, वेडी आहेत काय? तू मिजासखोर बनू नकोस. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, लोकांचा पैसा आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी अधिकाऱ्याला झापलं. पण त्यानंतर रोहित पवारांचा संताप अधिकच वाढला.
advertisement
तुमच्या बापाचा पैसा नाही
रोहित पवार यांना अधिकाऱ्याची एक वागणूक आवडली नाही. अधिकारी खिशात हात घालून उभा होता. त्यावेळी रोहित पवार यांनी आधी खिशातून हात काढ, असं म्हणत झापलं. तू लय शहाणा लागून गेलाय. इथं लोकं आलीत म्हणजे काम खराब झालं आहे. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे. तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहेत. काम चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे, असं रोहित पवार यावेळी म्हणाले. पण रोहित पवारांच्या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही - रोहित पवार
दरम्यान, भविष्यात कोणत्याही नागरिकाला अडचण आली नाही पाहिजे आणि कामं ही वेळेवर आणि नियमात झाली पाहिजेत, असा प्रयत्न आहे. त्यामध्ये मात्र दिरंगाई झाल्यास कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. याबाबत सक्त सूचना प्रशासनाला दिल्या. काही अडचणी या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहेत त्याचाही पाठपुरावा सुरु राहील, असं रोहित पवार म्हणाले.